Arvind Kejriwal|AAP|Delhi Liquor Scam Esakal
देश

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

अरविंद केजरीवाल असं का म्हणालेत, जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे. उद्या माझ्या अनेक बड्या नेत्यांसह मी भाजपच्या हेडक्वार्टरवर धडक देणार आहे, कोणा कोणाला तुम्हाला तुरुंगात टाकायचंय त्यांना टाका, असं त्यांनी जाहीर केलं आहे. (We are coming to BJP headquarters Arvind Kejriwal direct challenge to Prime Minister Narendra Modi)

केजरीवाल म्हणाले, "तुम्ही पाहात आहात की मोदी आम आदमी पार्टीच्या कसे मागे पडले आहेत, ते आमच्या नेत्यांना कशा प्रकारे तुरुंगात टाकत आहेत. त्यांनी मला तुरुंगात टाकलं, मनिष सिसोदिया यांना तुरुंगात टाकलं, संजय सिंह, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकलं. आज माझ्या पीएला देखील तुरुंगात टाकलं. आता ते राघव चढ्ढा जे नुकतेच लंडनवरुन परतलेत त्यांनाही तुरुंगात टाकणार असल्याचं कळतंय"

मला पंतप्रधानांना विचारायचं आहे की, तुम्ही हा जेल-जेलचा खेळ खेळत आहात. त्यानुसार आमच्या एकेका व्यक्तीला तुरुंगात टाकत आहात. उद्या मी १२ वाजता आमच्या सर्व बड्या नेत्यांसह, आमदार-खासदारांसह भाजपच्या मुख्यालयात येणार आहे. ज्यांना तुम्हाला तुरुंगात टाकायचंय टाका, एकाच वेळी सर्वांना तुरुंगात टाका.

तुम्हाला वाटतंय की, असं करुन तुम्ही आम आदमी पार्टीला चिरडून टाकाल पण अशा प्रकारे आम आदमी पार्टी संपणार नाही. एकदा तुम्ही सर्वांना तुरुंगात टाकून तर बघा. आम आदमी पार्टी हा विचार आहे जो संपूर्ण देशभरात लोकांच्या हृदयात पोहोचला आहे. जितक्या आपच्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात टाकाल तितके शेकडो नेते हा देश तयार करेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मी विचार करतोय की हे आम्हाला तुरुंगात का टाकत आहेत, आमची चूक काय आहे. आमची चूक ही आहे का की आम्ही दिल्लीतील गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची सोय केली, त्यासाठी चांगल्या सरकारी शाळा तयार केल्या. हे बनवू शकत नाहीत, त्यामुळं आमची कामं हे थांबवू पाहात आहेत. आम्ही दिल्लीत मोहल्ला क्लिनिक बनवलेत, चांगल्या मोफत उपचारांची सोय केली, ते हे करु शकत नाही.

दिल्लीतील २४ तास मोफत सुरु असणारी वीज यांना बंद करायची आहे, हीच आमची चूक आहे. यासाठीच ते आम्हाला तुरुंगात टाकत आहेत, अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्रही सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

Latest Marathi News Live Update : "डोके जागेवर येण्यासाठी हंडा-कळशी भेट!" — शिवसेना उबाठाचे आगळंवेगळं आंदोलन

Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार; गौतम गंभीरचं RO-KO बद्दल मोठं विधान, म्हणाला...

बाबो...! क्रिती सनॉनचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 8 वर्षाने लहान, शेअर केले फोटो, नेटकरी म्हणाले...'क्युट जोडी'

Shreyas Iyer Injury Update: श्रेयसला ICU मध्ये हलवलं; बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे झालाय आंतरिक रक्तस्राव, डॉक्टर म्हणतायेत...

SCROLL FOR NEXT