बांकुरा ः प्रचार सभेत भाषण करताना ममता बॅनर्जी.
बांकुरा ः प्रचार सभेत भाषण करताना ममता बॅनर्जी. 
देश

मला मारण्याचा भाजपचा कट आहे का?

पीटीआय

बांकुरा - भाजप निवडणूक आयोगात ढवळाढवळ करीत आहे. अमित शहा हेच आयोग चालवीत असून सूचना देत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला. आपल्याला मारण्याचा कट भाजप आखत आहे का, असा सवालही त्यांनी केला. नंदीग्राममध्ये झालेल्या दुखापतीबद्दल ममता यांनी भाजपला  जबाबदार धरले आहे, मात्र सुरक्षा व्यवस्थेतील चुकांमुळेच हे घडल्याचा निर्वाळा देत निवडणूक आयोगाने दिला. या पार्श्वभूमीवर ममता यांनी बांकुरात व्हिलचेअरवर बसून नेहमीच्या शैलीत आक्रमक भाषण केले.  त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने माझे सुरक्षा प्रमुखच हटविले आहेत. निवडणुकीपूर्वी मला जीवे मारण्याचा कट आखण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बाटला’ बनावट ठरविलेल्या ममतांचा राजीनामा कधी - नड्डा
कोटूलपुर - बाटला हाऊस चकमक बनावट असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला होता. तसे सिद्ध झाले नाही तर आपण राजकारण सोडू असेही त्या म्हणाल्या होत्या. आता न्यायालयाने अरीझ खान याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे, असे नमूद करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, आता ममता राजीनामा केव्हा देणार, असा सवाल उपस्थित केला, कोटुलपूर येथील प्रचार सभेत ते पुढे म्हणाले की, ममता राज्यात दुर्गाविसर्जन, सरस्वती पूजन होऊ देत नाहीत. मोहरमच्या वेळी मात्र त्या संचारबंदी शिथिल करतात. अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाची वेळ आली तेव्हा त्यांनी संचारबंदी लावली. बंगालची जनता ममता यांच्याकडून प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेईल. येथे भाजपच्या दिडशे कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्यांना आई नव्हती का? त्यांना पत्नी नव्हती का? त्यांना मुले नव्हती का?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT