mamata banarjee
mamata banarjee 
देश

माझी चूकच झाली, मी गाढवच ठरले; ममता बॅनर्जींचा संताप

सकाळ वृत्तसेवा

एग्रा  - West Bengal Assembly Election 2021  सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर त्यांचे वडिल आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार धक्का दिला. शिशिर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला. अधिकारी कुटुंबाचा बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिशिर अधिकारी म्हणाले की, 'तृणमूल काँग्रेससाठी अनेक कष्ट घेऊनही मला आणि माझ्या मुलांना चांगली वागणूक न मिळाल्याने ममता यांची साथ सोडणे भाग पडले.' दरम्यान, अधिकारी कुटुंबाचा खरा चेहरा मला ओळखता आला नाही, ही माझी चूकच झाली, मी गाढवच ठरले, असे म्हणत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शिशिर अधिकारी यांच्या भाजपप्रवेशावर संताप व्यक्त केला. 

आमच्या कुटुंबाला ज्याप्रमाणे तृणमूलमधून दूर केले गेले, ती बाब राज्याच्या राजकीय इतिहासात कोरली जाईल. आम्ही सर्व राजकीय हल्ल्यांमधून आणि अत्याचारांमधून बाहेर पडू. आम्ही मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करत जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करू. भाषण संपताना शिशिर अधिकारी यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’चा नाराही शिशिर अधिकारी यांनी यावेळी दिला.

विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये थेट सामना होणार आहे. हा मतदारसंघ पूर्व मिदनापूरमध्येच येतो. अधिकारी कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातील ही लढत ममता यांनीही प्रतिष्ठेची केली आहे. ही निवडणूक आपला मुलगा सुवेंदू सहज जिंकेल आणि पूर्व मिदनापूरमध्ये तृणमूलचा प्रचंड पराभव होईल , असा विश्‍वास शिशिर यांनी व्यक्त केला आहे. अधिकारी कुटुंबातील राजकीय वजन असलेल्या बहुतेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ओळखता आले नाही, ही चूकच
शिशिर अधिकारी यांच्या भाजप प्रवेशानंतर हे तर धोका देणारे ‘मीर जाफर’ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. एकेकाळचे निकटचे सहकारी आणि सध्याचे थेट प्रतिस्पर्धी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याबद्दल बोलताना ममता म्हणाल्या की, अधिकारी कुटुंबीयांनी पाच हजार कोटी रुपयांची माया जमविल्याचे आरोप होत आहेत. मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यावर याबाबत चौकशी करणार आहे. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत सिराज उदौला या बंगालच्या अखेरच्या नवाबाचा सेनापती असलेल्या मीर जाफरने नवाबाचा विश्‍वासघात केल्याने इंग्रजांचे फावले होते. ममता यांनी अधिकारी कुटुंबाची तुलना मीर जाफरबरोबर केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT