बांकुरा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी झालेल्या सभेत समर्थकांना अभिवादन करताना गृहमंत्री अमित शहा आणि इतर स्थानिक नेते.
बांकुरा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी झालेल्या सभेत समर्थकांना अभिवादन करताना गृहमंत्री अमित शहा आणि इतर स्थानिक नेते. 
देश

त्यांचे दु:ख कधी समजणार?; अमित शहा यांचा ममतांना सवाल

पीटीआय

राणीबंध - पायाला झालेल्या दुखापतीमुळे वेदना सहन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख कधी समजणार, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. शहा यांनी तृणमूल काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली. 

अमित शहा यांची आज बांकुरा जिल्ह्यातील राणीबंध येथे सभा झाली. भाजप राज्यात सत्तेत आल्यास सर्व राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, असे आश्‍वासन शहा यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले,‘‘दीदी, पायाला दुखापत झाल्याने तुम्हाला वेदना होत आहेत. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. पण, तृणमूलच्या गुंडांनी मारलेल्या १३० भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाचे काय? ते दु:ख कधी तुम्हाला जाणवले का? तुम्ही त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. या विधानसभा निवडणूकीत मतदान करताना जनता तुम्हाला याचे प्रत्युत्तर देईल.’’ भाजपला सत्ता मिळाल्यास आदिवासी लोकांच्या हक्कांचेही संरक्षण केले जाईल, असे शहा यांनी सांगितले. ‘आदिवासी दाखला देण्यासाठीही तृणमूलचे गुंड हप्ता हवा असतो. आम्ही आदिवासींना जमिनीवरील हक्क मिळवून देऊ. त्यांना शिक्षण, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्याही सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ,’ असे आश्‍वासन शहा यांनी दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
अमित शहा यांची आज सकाळी झारग्राम येथेही सभा होणार होती. मात्र, ते प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सभेसाठी ते पोहोचू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी सभेसाठी जमलेल्या लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT