amit shah narendra modi file photo
देश

प. बंगालमधील पराभव भाजपच्या जिव्हारी

सकाळ वृत्तसेवा

पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणकीत (west bengal assembly election 2021 result) तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाकडून झालेला पराभव भाजपला जिव्हारी लागला असला तरी आता पक्षाच्या राज्यातील नेत्यांमध्येच मतभेदाचे सूर उमटू लागले आहेत.

कोलकता- पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणकीत (west bengal assembly election 2021 result) तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाकडून झालेला पराभव भाजपला जिव्हारी लागला असला तरी आता पक्षाच्या राज्यातील नेत्यांमध्येच मतभेदाचे सूर उमटू लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते व त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय(tathagat roy) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, शिव प्रकाश, अरविंद मेनन आणि प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. (west bengal assembly election 2021 result bjp lost tathagat roy criticize leaders)

तथागत रॉय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पश्‍चिम बंगालमध्ये झालेली भाजपची हार पाहता पक्षात मोठे बदल केले नाहीत तर पक्ष मजबूत करण्यासाठी जे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करीत आहेत, तेही पक्षाला सोडून जाऊ शकतात. असे झाल्यास पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचा तो शेवट असू शकेल. भाजपच्या पराभवाला मी केंद्र सरकारला दोष देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१३० कोटी लोकसंख्येच्या देशात केंद्रीय नेतृत्व जो आदेश देतो, त्याचे पालन राज्यातील नेतेच करतात, पण येथे असे झाले नाही. बंगालमधील भाजपचे जे नेते आहेत, त्यांना काहीही माहीत नाही, अशी टीका करीत रॉय यांनी राज्यात भाजप मागे पडण्याचे एक कारण कार म्हणजे भाजपच्या छताखाली आलेला तृणमूलमधील कचरा. भाजपचे कार्यकर्ते १९८०पासून पक्षासाठी सातत्याने काम करीत होते, त्यांना तृणमूल काँग्रेसचा त्रास सहन करावा लागत आहे. पण भाजपचे ‘कैलास-दिलीप-शिव- अरविंद’ (केडीएसए) त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाहीत, त्यांना काम करण्यास उभारीही दिली नाही. उलट ‘तृणमूल’मधून आलेल्या कचऱ्याला निवडणुकीचे तिकीट देण्यात आणि त्यांना सप्ततारांकित हॉटेलमध्ये आराम करता यावा, यासाठी ते झटत होते. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अत्याचार, छळाला सामोरे जावे लागत आहे, असे रॉय यांनी सांगितले.

पंतप्रधान व गृहमंत्र्यांचे नाव धुळीला मिळविले

पश्‍चिम बंगालमध्ये मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान ‘केडीएसए’ने केला आहे. या चारही नेत्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे नाव धुळीला मिळविले आहे. देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाची जगात नाचक्की केली आहे, अशी संतप्त भावनाही तथागत रॉय यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT