Mamata Banerjee  
देश

ममतांनी PM मोदींना पुन्हा लिहलं खरमरीत पत्र; म्हणाल्या...

विनायक होगाडे

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. यावेळी त्यांनी सुधारित वीज विधेयक २०२० पुन्हा एकदा संसदेत पटलावर आणण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला आहे. त्यांनी याबद्दल आपली नापसंती जाहीर करत हे विधेयक जनविरोधी असल्याचं म्हटलंय.

मागच्या वर्षी देखील पत्र लिहून केला होता विरोध

या पत्रात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना आग्रह केलाय की, त्यांनी या विधेयकाबाबत पुढील कार्यवाही करु नये. या प्रकरणी व्यापक आणि पारदर्शकपणे चर्चा लवकरात लवकर केली गेली पाहिजे. त्यांनी या पत्रात हे विधेयक केंद्र सरकारद्वारे पुन्हा एकदा संसदेत सादर केल्या जाण्याच्या प्रयत्नांविरोधात आपला विरोध प्रकट केला आहे. या विधेयकावर जोरदार टीका केली जात आहे. गेल्या वर्षी देखील सरकारने हे विधेयक संसदेत सादर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमच्यापैकी अनेक लोकांनी विधेयकाच्या प्रारुपाला विरोध करत या विधेयकाच्या जनता विरोधी बाजूंना लोकांसमोर आणलं होतं.

या पत्रात त्यांनी लिहलंय की, याआधी १२ जून २०२० रोजी मी पत्र लिहून या विधेयकामुळे होणाऱ्या मुख्य नुकसानीकडे तुमचं लक्ष वेधलं होतं. या विधेयकाला पारित करण्याचा प्रयत्न म्हणजे देशाच्या संघराज्य चौकटीला उद्ध्वस्त करण्याचा एक प्रयत्न म्हटलं होतं. मी हे ऐकून हैराण आहे की, या विधेयकाबाबत आम्हाला असलेल्या अडचणींबाबत कसलाही विचार न करता हे विधेयक पुन्हा एकदा पटलावर आणलं जात आहे. तसेच यामध्ये आणखी काही लोकविरोधी तरतूदी केल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT