mamta-banerjee 
देश

"नंदीग्राममध्ये फेरमतमोजणी घेतल्यास जीवाला धोका"

कार्तिक पुजारी

कोलकाता- ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळाला असला तरी, ममतांना नंदीग्राम मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागलाय. कधीकाळी त्यांचे सहकारी असणाऱ्या आणि आता भाजपवासी झालेल्या सुवेंदू अधिकारी यांनी त्याचा पराभव केलाय. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत गोंधळ पाहायला मिळाला. आधी ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर काही वेळाने सुवेंदू अधिकारी विजय झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

नंदीग्राममध्ये फेर मतमोजणी घेतल्यास जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं रिटर्निंग अधिकाऱ्याने म्हटल्याचा दावा ममतांनी केला आहे. ममतांनी एका एसएमएसचा हवाला दिला आहे. ''मला एकाकडून मेसेज मिळालाय ज्यात रिटर्निंग अधिकाऱ्याने एकाला लिहिलं आहे की, त्याने फेर मतमोजणीला परवानगी दिल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल. त्यामुळे मी फेर मतमोजणीचा आदेश देऊ शकत नाही. माझं कुटुंब उद्धवस्त होईल, मला छोटी मुलगी आहे.'' ममता मोबाईलमधून हा मजकूर वाचत होत्या.

ममतांचा सुवेंदू अधिकारी यांनी 1700 पेक्षा अधिक मतांनी पराभव केलाय. पण, त्यांच्या या विजयावर तृणमूलने आक्षेप घेतलाय. मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. ममतांनी थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय. नंदीग्राममधील मतमोजणीदरम्यान सलग 4 तास सर्व्हर बंद असल्याचा आरोपही ममतांनी केलाय. राज्यपालांनी माझे अभिनंदल केले होते, पण अचानक सर्वकाही बदललं, असं ममता म्हणाल्यात.

तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ''पक्ष निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. नंदीग्राममध्ये मोठा घोळ झालाय. पक्षाने जोरदार विजय प्राप्त केला असताना मुख्यमंत्र्यांच पराभव कसा झाला. काही मोठं कारस्थान झालंय.'' पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलने 213 जागांवर विजय मिळवलाय, तर भाजपला 77 जागा मिळाल्या आहेत. बंगालमध्ये 292 जागांसाठी निवडणूक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

Fifa World Cup 2026 : घानाचा 'घाला'! तगड्या इंग्लंडला रडवले; २८ वर्ष, दुसरा सामना अन् परंपरा कायम, L गटात खतरनाक चुरस

Success Story: सामान्य कुटुंबातून असामान्य यश! यशवंत जगतापांची प्रेरणादायी कामगिरी; सरकारी भरती परीक्षांत यशाचा धडाका

SCROLL FOR NEXT