West Bengal Governor Jagdeep Dhankhar 
देश

राज्यपाल म्हणतात, 'लोकांसाठी छातीवर गोळी खाण्यास तयार'

कार्तिक पुजारी

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (West Bengal Governor Jagdeep Dhankhar) यांनी आसामच्या रनपगलीमधील एका शिबिराचा शुक्रवारी दौरा केला.

कोलकाता- पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (West Bengal Governor Jagdeep Dhankhar) यांनी आसामच्या रनपगलीमधील एका शिबिराचा शुक्रवारी दौरा केला. स्वत:ला भाजप समर्थक सांगणाऱ्या अनेक कुटुंबियांनी याठिकाणी आश्रय घेतला आहे. या परिवारांचा आरोप आहे की, विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले. उत्तर बंगालच्या कूच बिहारचे भाजप खासदार नीतिश प्रमाणिक यांच्यासोबत राज्यपालांनी धुबरी जिल्ह्यातील शिबिराचा दौरा केला आणि लोकांशी चर्चा केली. याठिकाणी अनेक महिला आणि मुलांनी आश्रय घेतला आहे. (West Bengal Governor Jagdeep Dhankhar in Siliguri mamta banarjee)

दौऱ्यादरम्यान, बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड म्हणाले की, राज्यातील लोक पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास घाबरत आहेत. सत्ताधारी पक्षांच्या कार्यकत्यांची पोलिसांना भीती आहे. मी त्यांना वापस येण्यास प्रोत्साहित केलं आहे, मी त्यांच्यासाठी आपल्या छातीवर गोळी खाईन. मी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. त्यांना बहुमत मिळालं आहे, त्यांनी संघर्ष सोडून द्यावा. राज्यपाल पुढे म्हणाले की, सीतलकुचीची घटना दुर्भाग्यपूर्ण आहे, पण हा नरसंहार आणि कोल्ड ब्लड मर्डर आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी एसआयटी स्थापन केली आणि एसपीला सस्पेंड केलं. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की, संपूर्ण राज्य जळत होतं, तेव्हा त्यांना हे दिसत नव्हतं का?

शिबिरमध्ये राहणाऱ्या लोकांनी दावा केलाय की, 2 मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपलं पश्चिम बंगालमधील घर सोडून दिलं आहे. त्यांनी असाही आरोप केलाय की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराची तोडफोड केली. राज्यपालांनी पश्चिम बंगालमधील हिंसेमुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली. त्यांना सीतलकूचीमध्ये काळे झेंड दाखवण्यात आले. या मुद्यावरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर, युएई, कतार, इराकसह ८ देशांना केलं टार्गेट; होमुर्झची सामुद्रधुनी केली बंद

15,78,00,00,000 इतकी आहे अमिताभ यांच्याकडे संपत्ती, आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरच काही...

T20 World Cup : संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळणार? वर्ल्डकपमध्ये आज भारत-वेस्टइंडीज टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू, ट्रम्प यांचा दावा; इराणची सत्ता कोण सांभाळणार?

LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, होळीच्या आधीच महागाईचा फटका

SCROLL FOR NEXT