Mamata Banerjee
Mamata Banerjee esakal
देश

गोव्यात भाजपला मोठा धक्का; सरदेसाईंचा पक्ष 'तृणमूल'शी हातमिळवणी करणार?

सकाळ डिजिटल टीम

गोव्यातील बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय.

गोवा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील (West Bengal Assembly Election) विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरात तयारी सुरूय. सर्वच पक्षांचे प्रमुख गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज (शनिवार) गोवा फॉरवर्ड पक्षाचे (Goa Forward Block) अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर गोव्यात टीएमसीची गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोव्यातील बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींचं नाव न घेता ममता बॅनर्जी म्हणाल्या, ज्यांनी 'अच्छे दिन' आणले ते देशाला बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच ममतांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केलाय. काँग्रेसमुळेच पंतप्रधान मोदी इतके ताकदवान झाले आहेत, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज प्रादेशिक पक्षांशी युती करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, आज गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगलीय. ममता बॅनर्जी या प्रादेशिक अभिमानाचं प्रतीक आहेत, आम्हीही प्रादेशिक पक्ष आहोत. त्यामुळं भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असं त्यांनी आवाहन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, फॉरवर्ड पार्टी तृणमूल काँग्रेससोबत युती करण्याच्या तयारीत आहे. गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत शुक्रवारी पोहोचलेल्या ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा केली.

भाजप जातीयवादी पक्ष

सरदेसाई यांनी सांगितलं, की त्यांचा पक्ष राज्यात मजबूत स्थितीत असून तृणमूल काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहे. भ्रष्ट आणि जातीयवादी राजवट संपवण्यासाठी विरोधकांची एकजूट महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. या वर्षी एप्रिलमध्ये गोवा फॉरवर्ड पक्षानं भाजपसोबतची युती तोडलीय. दरम्यान, सीएम ममता बॅनर्जी यांनीही पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत बोलणी झाल्याचे मान्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT