WHATS APP  Team eSakal
देश

फेसबुक व्हाट्सअ‍ॅप झालं डाऊन; नेटकरी हैराण

यापुर्वी देखील अनेक वेळा फेसबूक आणि व्हाट्सअप बंद झाले होते.

सुधीर काकडे

अगदी काही वेळापुर्वी तुम्हीही तुमचं फेसबुक आणि व्हाट्सअप सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल, मात्र ते झाले नसेल. कारण ही अडचण तुमच्या एकट्याला येत नसून हा सर्वर प्रॉब्लेम आहे. आज सायंकाळी 9:15 वाजेच्या सुमारास फेसबूक आणि व्हाट्सअप अॅप्लिकेशन बंद झाले. सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबूक आणि व्हाट्सअप वगळता सर्व संकेतस्थळं सुरू असल्याचे दिसले. काही वेळानंतर हे प्लॅटफॉर्म बंद असल्याचे अधिकृत वृत्त एएनआयकडून देण्यात आले. यापुर्वी देखील अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबूक आणि व्हाट्सअप बंद झाल्याचे आढळले होते.

सोशल मीडिया ही गोष्ट आता प्रत्येकासाठीच अत्यावश्यक झाली असून, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याने अनेकजण हैराण झाले होते. त्यानंतर आता ट्विटर व्हाट्सअपआणि फेसबूक डाऊनचा हॅशटॅग ट्रेंड झाले आहे. त्यानंतर अनेकांनी आपलं फेसबूक, व्हाट्सअप बंद झाल्याने वेगवेळे प्रयोग करून सुरू करण्याचा प्रयत्न केले. मात्र नंतर कंपनीकडूनच अडचण असल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT