कोणत्या वयोगटासाठी ओमायक्रॉनचा धोका अधिक? sakal
देश

कोणत्या वयोगटासाठी ओमायक्रॉनचा धोका अधिक?

बंगळुरूमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले दोन रुग्ण सापडले

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असले, तरी जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनचा धोका कोणत्या वयोगटासाठी अधिक आहे निश्चित केले नाही. तरीही दुसऱ्या लाटेदरम्यान देशात लहान मुलांवरील उपचाराची यंत्रणा उभी करण्याची तयारी सुरू केली होती. तसेच राज्यांना त्यासाठी निधी आणि औषधेही पुरविण्यात आली आहे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी 'सकाळ'शी बोलताना केली.

लोकसभेत देशातील कोरोना स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट याविषयी सुमारे बारा तास चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर सकाळने डॉ. पवार यांच्याशी संवाद साधला. देशातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. बंगळुरूमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले दोन रुग्ण सापडले असले, तरी गोंधळून जाण्याची गरज नाही. केंद्र सरकार नवीन विषाणूबाबत सतर्क आहे आणि राज्यांना देखील परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ओमायक्रॉनचा अधिक संसर्ग झालेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. राज्यांना देखील तशा सूचना दिलेल्या आहेत. हा विषाणू येणाऱ्या पूर्वी केंद्र सरकारने सुमारे 23 हजार कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला होते. त्यात कोरोनाची तिसरी लाट रोखणे, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधा भक्कम कराव्यात, त्यात लहान मुलांवरील उपचारासाठी सक्षम व्यवस्था उभारावी, असे अपेक्षित होते. त्यासाठी ऑक्सिजन प्लॅंट, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि औषधांसाठी या कृती आराखड्यातून निधी राज्यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही ही मदत पोचली आणि हे काम लवकर पूर्ण करा, यासाठी आम्ही राज्यांकडे तगादा लावला आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन हा विषाणू कोणत्या वयोगटासाठी घातक आहे, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र केंद्र सरकार लहान मुले आणि सहव्याधी असलेल्या 40 वयोगटापुढील नागरिकांबाबत सतर्क आहे. बुस्टर डोसबाबतही दरवेळी प्रश्न विचारला जातो. परंतु हा डोस‌ द्यायचा‌ की नाही, हा राजकीय निर्णय नाही. त्याला वैद्यकशास्र आणि विज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. बुस्टर डोसबाबत अन्य देशात काय स्थिती आहे, याचाही विचार केला जातो. त्यामुळे यासंदर्भात तज्ज्ञांकडून शिफारस आली, तर केंद्र सरकार त्याबाबत निश्चित विचार करील, अशी ग्वाही डॉ. पवार यांनी दिली.

देशात लसीचा शंभर कोटींचा टप्पा पार झाला आहे. पण 47 टक्के दोन डोस पूर्ण झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचे गांभार्य ओळखून केंद्राने हर घर दस्तक योजना सुरू केली. यामध्ये केवळ केंद्र नव्हे; तर राज्य सरकारे आणि सामाजिक, धार्मिक नेतृत्व यांनी देखील सक्रीय सहभाग आणि जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपली काळजी आणि आपल्याबरोबर इतरांचीही काळजी म्हणून लसीकरण करून घेतले पाहिजे. कारण यापूर्वीच्या कोरोना लाटेमुळे झालेले नुकसान यापुढे परवडणार नाही. त्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.

ओमायक्रॉनचा संसर्ग समजण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग आवश्यक आहे. पण त्याचा वेग देशात कमी आहे, या प्रश्नावर डॉ. भारती पवार म्हणाल्या, जिनोम सिक्वेन्सिंग हे आधीपासून केले जाते. पण आता त्याची जास्त गरज लागणार आहे. तशा प्रयोगशाळा दिल्ली, पुणे सारख्या शहरांमध्ये आहे. पूर्वी या चाचण्यांना खूप वेळ लागत होता. पण आता या चाचण्या लवकरात लवकर मिळाव्यात, त्यावरून उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, त्यादृष्टीने केंद्र सरकारने या प्रयोगशाळांना सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT