देश

भाजपकडून म्हापशात कोण? सरदेसाईंच्या गुगलीने बदलली समीकरणे

अवित बगळे

लोकसभा 2019 ः पणजी ः म्हापसा मतदारसंघाचे 26 वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे आमदार अॅड. फ्रांसिस डिसोझा यांच्या दीर्घ आजराने झालेल्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी कोण हा पेच भाजपसमोर आजही आहे. डिसोझा यांचा पूत्र जोसुआ याने आपल्या पित्याचा वारसा पुढे न्यावा असे आवाहन भाजपच्या सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले. त्या आवाहनला जोसुआ यांनी प्रतिसादही दिला आहे. त्यामुळे आता भाजपला उमेदवारी ठरवताना हे समीकरण जमेस धरावे लागणार आहे.

तत्कालीन संरक्षणमंत्रीपदी असलेल्या मनोहर पर्रीकर यांना राज्यात मुख्यमंत्रीपदी परतायचे होते तेव्हा डिसोझा यांनी त्यांच्यासाठी विधानसभेतील जागा खाली करावी व राज्यपालपद स्वीकारावे असा प्रयत्न सुरु होता. त्याआधी उपमुख्यमंत्रीपदी असूनही पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने रागावलेल्या डिसोझा यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यांना आपल्या पुत्राला आपली जागा द्यायची होती असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे भाजपच्या मागील सरकारमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या डिसोझा यांना नव्या सरकारमध्ये चौथ्या क्रमांकावर ढकलण्यात आले होते असेही मानले जाते.

डिसोझा यांच्या निधनामुळे तेथून भाजप आता कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत जोसुआ हेच भाजपचे उमेदवार असतील असे भाजपने जाहीर न केल्यामुळे यातील गुंता वाढला आहे. गोवा फॉरवर्डचे सरदेसाई यांनी जोसुआ यांना आवाहन करून भाजपसमोर म्हापशात पेच निर्माण केला आहे. डिसोझा यांच्याशी गेली सव्वीस वर्षे प्रमाणिक असलेले चारेक हजार मतदार म्हापशात आहेत. त्यामुळे तेथे वेगळा प्रयोग भाजपच्या अंगलट येऊ शकतो. भाजप तेथे वेगळा विचार करू शकतो याचा अंदाज आल्याने सरदेसाई यांनी जोसुआच्या आवाहनाच्या रुपाने टाकलेल्या गुगलीमुळे भाजपला आता थोडे बॅकफूटवर जावे लागल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT