WHO Cautions Countries On Easing COVID Lockdown Restrictions 
देश

Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेने जगाला दिला पुन्हा इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : योग्य ती काळजी घ्या, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने जगाला दिला आहे. लॉकडाऊन कमी करताना जर पूर्वकाळजी घेतली नाही तर परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा संपूर्ण जग लॉकडाऊन करण्याची वेळ येईल असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव हा जगभरात झाल्याने संपूर्ण जगच लॉकडाऊन करण्यात आले होते. यानंतर काही दिवसांनी हळूहळू काही देश लॉकडाऊनचे नियम शिथील करत आहेत. अशात जागतिक आरोग्य संघटनेने हा गंभीर इशारा दिला आहे. टेड्रोस म्हणाले, 'सर्व देशांनी काळजी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊन लगेचच शिथील न करता टप्प्याटप्प्याने उठवण्याची गरज आहे. निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज असून आरोग्य यंत्रणाही तयार असली पाहिजे असेही ट्रेडोस म्हणाले.

दिलासादायक ! लॉकडाऊनमध्ये 'या' कार निर्माता कंपनीने घेतला मोठा निर्णय

टेड्रोस यांनी निर्बंध शिथील करताना काय काळजी घेण्यासंबधी काही मुद्दे मांडले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी पूर्वीप्रमाणे सगळं काही सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की कमी होईल, पण त्यानंतर जनजीवन पूर्वीप्रमाणे राहणार नाही. आपण घाबरुन जगू शकत नाही, पण त्याचवेळी तयार राहणं गरजेचं आहे. आपण एकीकडे या महामारीशी लढा देत असताना दुसरीकडे अशा साथींचा सामना कऱण्याची तयारीही करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धक्कादायक ! गॅस गळतीमुळे ७ जणांचा मृत्यू तर, ५०००हून अधिकांची प्रकृती गंभीर

जगभरातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी ही योग्य संधी असून गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्षच करण्यात आलं आहे. आपण, कोरोनापासून धडा घेतला पाहिजे. आपण आता मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेत गुंतवणूक करायला हवी. तरच, आपले प्राण वाचू शकतील असेही ट्रे़डोस म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena–AIMIM Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिनसेनेची देखील AIMIM सोबत युती

बंडखोरी भोवली! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर मालेगावात भाजपकडून दोन माजी महापौरांची पक्षातून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये वाळू व्यावसायिकांवर ईडीची धाड

लोकशाहीची सुरवात पाश्चात्य देशात नाही तर भारतातील 'या' राज्यात झाली! CM योगी आदित्यनाथांनी दिले पुराव्यांसह उत्तर

Farmer Success Story: अंकितची केळी गेली साता समुद्रापार; युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ, अडीच एकरात लाखांचे उत्पन्न..

SCROLL FOR NEXT