देश

Sushma Swaraj : कोण आहेत बांसुरी स्वराज? सुषमा स्वराज यांच्या मुलीकडे भाजपने दिली जबाबदारी

संतोष कानडे

नवी दिल्लीः भाजपच्या दिग्गज आणि दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी यांनी सक्रीय राजकारणात एन्ट्री केली आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी बांसुरी यांच्याकडे लीगल सेलच्या सहसंयोजक पदाची जबाबदारी दिली आहे.

बांसुरी ह्या भाजपसोबत काम करत होत्या मात्र संघटनेत पहिल्यांदाच त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. बांसुरी यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत.

कोण आहेत बांसुरी?

बांसुरी स्वराज यांची २००७मध्ये बार काऊंसिल ऑफ दिल्लीमध्य नोंदणी झाली. त्या मागील १६ वर्षांपासून वकिली व्यवसायात आहेत. त्या फौजदारी प्रकरण हाताळतात. मागील १६ वर्षांपासून बांसुरी ह्या वकिली व्यवसाय करतात. वॉरविक विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या सुप्रसिद्ध लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास केला.

त्यानंतर बांसुरी ह्या बॅरिस्टर झाल्या. पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून त्यांनी मास्टर ऑफ स्टडीज पूर्ण केले. त्या कोर्टामध्ये आपल्या पक्षाची बाजू समर्थपणे मांडतात. त्यांनी वेगवेगळ्या कोर्टामध्ये अनेक हायप्रोफाईल केसेस लढल्या आहेत. आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतरही त्या चर्चेत आल्या होत्या. भाजपने त्यांच्या बचाव करत सांगितलं होतं की, बांसुरी यांना त्यांचं प्रोफेशन आणि कामासाठी स्वातंत्र्य आहे.

याच्याशिवाय बांसुरी यांनी रियल इस्टेट, टॅक्स, आंतरराष्ट्रीय वाणिज्य धोरणांच्या बाबतीतील केसेस त्यांनी लढलेल्या आहेत. खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या बांसुऱ्या हरियाणाच्या महाधिवक्ता राहिलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT