who is priya das who lit cigarette with burning manusmriti non veg smoke cigarette watch viral video  Sakal
देश

Manusmriti Video : ती मनुस्मृती पेटवून त्यावर कोंबडी शिजवणारी तरूणी नेमकी आहे तरी कोण?

सकाळ डिजिटल टीम

मनुस्मृति पेटवणाऱ्या आणि त्या आगीवर चिकन शिजवणाऱ्या मुलीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियात यावरून चर्चा सुरू झाली आहे. मनुस्मृतीचे दहन करणारी प्रिया दास ही बिहारमधील शेखपुरा येथील रहिवासी आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

कोण आहे प्रिया दास

बिहारमधील शेखपुरा येथे राहणारी प्रिया 27 वर्षांची आहे. प्रिया ही अजून शिक्षण घेत आहे आणि शिक्षिका बनण्याचा तिचा विचार आहे. प्रियाने सीटीईटी पास केली असून पीएचडी करत असल्याचे सांगितले जात आहे. राजकारणातही ती सक्रिय आहे. प्रिया लालू प्रसाद यादव यांच्या पक्ष आरजेडीशी संबंधित आहे. पक्षात ती महिला सेलच्या प्रदेश सचिव म्हणून काम पाहते.

मनुस्मृती का जाळली?

प्रिया दास यांनी सांगितले की, तिने मनुस्मृती सुमारे 500 रुपयांना विकत घेतली होती. त्यांनी सांगितले की, मनुस्मृतीमध्ये असे लिहिले आहे की जर एखाद्या महिलेने दारू प्यायली तर तिला अनेक प्रकारे शिक्षा होऊ शकते. तसेच न्याय करण्याआधी संबंधितांची जात जाणून घेण्याचेही लिहिले आहे.

मनुस्मृती का जाळली?

मनुस्मृती पेटवणे, सिगारेट ओढणे आणि कोंबडी शिजवण्याचा व्हिडिओ ट्विटरवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. मनुस्मृती जाळणे चुकीचे असल्याचे शेकडो लोकांनी म्हटले आहे. मात्र, असे अनेक लोक आहेत ज्यांनी प्रियाच्या सिगारेट ओढण्यास आणि कोंबडी शिजवण्यावर देखील टीका केली आहे. इंडिया टुडेशी बोलताना प्रिया दास म्हणाली की, मी नॉनव्हेज खात नाही आणि सिगारेटही ओढत नाही. फक्त व्हिडिओसाठीकोंबडी शिजवण्यात आली आणि निषेध नोंदवण्यासाठीच मनुस्मृतीचे दहन करण्यात आल्याचे तिने सांगितले.

स्वत:ला दलित कार्यकर्ता म्हणवणारी प्रिया दास एका व्हिडिओमध्ये म्हणते की, मनुस्मृती जाळणे ही एक कृती आहे, तात्काळ घडलेली घटना आहे. बाबासाहेबांनी त्याच्या जळण्याचा पाया फार पूर्वीच घातला होता. मनुस्मृती जाळण्याचा उद्देश कोणाही व्यक्तीच्या विरोधात नसून दांभिकता, ढोंगीपणाच्या विचारांवर प्रहार करणे हा आहे.

हेच माझे ध्येय होते. प्रिया दास म्हणाली की, ही फक्त सुरुवात आहे. असा ग्रंथ अस्तित्वात नसावा. हे पुस्तक कोणत्याही अर्थाने योग्य नाही. माणसाला कोणत्याही पुस्तकातून ज्ञान मिळते, पण भेदभाव आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम हे पुस्तक करते. अशा परिस्थितीत अशा पुस्तकाला विरोध व्हायलाच हवा.

प्रिया दासने सांगितले की, या पुस्तकात मानव आणि महिलांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या कधीच योग्य ठरणार नाहीत. या पुस्तकाचे प्रत्येक पान जाळले पाहिजे. प्रिया म्हणाल्या की, दलित लोकांनी पुढे येऊन अशा पुस्तकाला विरोध केला पाहिजे.

यादरम्यान प्रियाने असा दावाही केला की, समाजात पसरलेल्या सर्व वाईट गोष्टींच्या मुळाला मनुस्मृती आहे. मग ते स्त्रियांशी संबंधित असो किंवा विवाह प्रथांशी संबंधित असो. बाबासाहेबांनीही मनुस्मृतीचे दहन केल्याचे ती म्हणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT