who was first indian women doctor sakal
देश

Anandibai Joshi : आनंदीबाई जोशी या एकट्याच पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या का ?

गोपाळरावांनी स्वतःची बदली कोल्हापूरला करून घेतली आणि इंग्रजी मिशनरी स्कूलमध्ये आनंदीबाईंचे शिक्षण सुरु झाले. ख्रिस्ती मुली आनंदीबाईंना हीन वागणूक देत असत.

नमिता धुरी

मुंबई : काही वर्षांपूर्वी आलेल्या आनंदी-गोपाळ या सिनेमाने आनंदी-गोपाळ ही कादंबरी चर्चेत आली. तत्पूर्वी आपण शालेय जीवनात पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी (anandibai joshi ) यांच्याविषयी जाणून घेतलेच होते.

आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या या ओळखीबद्दल काहीसा वाद जाणकारांमध्ये दिसून येतो. हेही वाचा - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

आनंदीबाईंने घेतलेले परिश्रम, त्यांनी देशाचे नाव मोठे करणे याबाबत कोणाचेच दुमत नाही; मात्र आनंदीबाईच देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या का आणि असतील तर त्या तशा एकमेव होत्या का यावरून मतंमतांतरं आहेत. (who was first indian women doctor)

खडतर जीवनप्रवास

आनंदीबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळ जोशी यांच्याशी झाले. गोपाळराव शिक्षण आणि इंग्रजी भाषेबाबत आग्रही होते. त्यांनी आनंदीबाईंना प्राथमिक शिक्षण घरातच दिले.

गोपाळरावांनी स्वतःची बदली कोल्हापूरला करून घेतली आणि इंग्रजी मिशनरी स्कूलमध्ये आनंदीबाईंचे शिक्षण सुरु झाले. ख्रिस्ती मुली आनंदीबाईंना हीन वागणूक देत असत.

एकीकडे रूढीवादी हिंदू आणि दुसरीकडे ख्रिस्ती सहविद्यार्थिनी यांच्याकडून होणारा त्रास यांवर मात करत त्यांनी शिक्षण घेतले.

वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाई आई झाल्या; पण त्यांचे हे मातृत्त्वाचे सुख फार काळ टिकले नाही. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रसंगातून आनंदीबाईंना डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर बंगालच्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जायचे असल्यास ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल असा सामाजिक दबाव त्यांच्यावर होता. आनंदीबाईंनी हा दबाव झुगारून आपली सांस्कृतिक ओळख परदेशातही कायम ठेवली.

आनऺदीबाई जोशी यांनी १८८४ मध्ये अमेरिकेतील वुमेन्स मेडिकल कॉलेज पेन्सिल्वेनिया डिक्सेल विद्यापीठ येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ठरल्या.

आनंदीबाईंचा मृत्यू

अमेरिकेत असतानाच आनंदीबाईंना क्षयरोगाचं निदान झालं होतं. भारतामध्ये परतल्यानंतर कोल्हापूरच्या  Albert Edward Hospitalमध्ये त्यांची physician-in-charge म्हणून नेमणूक झाली होती. 

आनंदीबाईंना त्या काळी योग्य उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे वर्षभरातच वयाच्या २१व्या वर्षी २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांचं निधन झालं.

पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

आनंदीबाईंची लवकर निधन झाल्याने त्यांना डॉक्टर म्हणून काम करता आलं नाही. त्यांच्या पाठोपाठ १८९४मध्ये डाॅ. रखमाबाई राऊत (rakhmabai raut) यांनी लऺडन स्कूल ऑफ मेडिसिन येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली.

डॉ. राऊत यांचे निधन १९५५ मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस केली. त्यामुळे आनंदीबाई जोशी या वैद्यकीय पदवी घेणाऱ्या पहिल्या महिला असल्या तरी पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर म्हणून रखमाबाईंचं नाव घेतलं जातं.

डॉ. जोशी की डॉ. राऊत या चर्चेत एक नाव मात्र कायम दुर्लक्षित राहिलं ते म्हणजे डॉ. कदंबिनी गांगुली.

आनंदीबाईंच्याच काळातच १८८४ मध्ये डॉ. कदंबिनी गांगुली या स्काॅटलंडमधून वैद्यकीय प्रशिक्षण घेऊन कोलकात्याला परतल्या होत्या. त्यामुळे भारतातील प्रथम महिला डॉक्टर होण्याचा मान डाॅ. आनऺदीबाई जोशी आणि डॉ. कदंबिनी गांगुली (kadambini ganguly) या दोघींकडेही जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना भूकंप, ना पाऊस... तरी खचला राष्ट्रीय महामार्ग, स्कूलबससह अनेक गाड्या अडकल्या

ज्वालामुखी, नैसर्गिक आपत्ती अन् ... 2026 बाबत पुराणात नेमकं काय लिहिलंय, भविष्यवाणी कलियुगासाठी ठरत आहेत खरी? वाचा धक्कादायक सत्य!

Mahaparinirvan : कशी होती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा? लाखोंची गर्दी अन् अश्रुधारा, महापरिनिर्वाण दिनाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

ही होती रोल्स रॉयसमधून फिरणारी पहिली भारतीय अभिनेत्री, स्टाईलने प्रेक्षकांना केलं मंत्रमुग्ध पण शेवट झाला दुर्दैवी

Grok AI : एआयने जग जाहीर केला तुमच्या घराचा पत्ता अन् फोन नंबर; इलॉन मस्कच्या ग्रोकने ओलांडल्या सर्व सीमा, पाहा आता काय करायचं?

SCROLL FOR NEXT