

Faisal Shinozada | U19 World Cup
Sakal
India vs Afghanistan U19 World Cup Semi-Final : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत दुसरा उपांत्य सामना बुधवारी (४ फेब्रुवारी) भारत आणि अफगाणिस्तान संघात खेळवला जात आहे. हरारेमध्ये होत असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना पहिल्या डावात दमवल्याचे दिसले.
अफगाणिस्तानकडून फैझल शिनोझादा (Faisal Shinozada) आणि उझैरुल्लाह नियाझाई (Uzairullah Niazai) यांनी दमदार शतकं केली. त्यामुळे अफगाणिस्ताने भारतासमोर ३११ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आता भारताला जर विजय मिळवायचा असेल, तर इतिहास घडवावा लागणार आहे. कारण आत्तपर्यंत एवढं मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये (U19 World Cup) झालेला नाही.