india-china
india-china 
देश

भारत विरुद्ध चीन: कागदावर ड्रॅगनची शक्ती मोठी, पण...

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

नवी दिल्ली- पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला. यात भारताचे 20 जवान शहीद झाले, तर चीनचे 43 सैनिक मारले गेल्याचा दावा भारत सरकारकडून करण्यात आला. तेव्हापासून उभय देशांमधील संबंध कमालीचे स्फोटक बनले आहेत. भारताने चीनला धडा शिकवण्यासाठी सर्व पर्यायांचा अवलंब सुरु केला आहे. भारताने नुकतेच 59 चिनी अॅप्सवर बंदी आणून डिजिटल स्ट्राईक केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील स्थिती अधिक चिघळली असून सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कोणते राष्ट्र वरचढ ठरेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तसेच कोणत्या देशाकडे किती आणि कशाप्रकारची शस्त्रास्त्रे आहेत याबाबत अभ्यास सुरु झाला आहे. 

2019 च्या युद्ध मशीन आकडेवारीनुसार, चीन हा भारतापेक्षा प्रत्येक गोष्टींमध्ये वरचढ आहे. केवळ भारताची सैन्य संख्या ही चीनपेक्षा अधिक आहे. भारत आणि चीनमध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांनी तुलना आपण सविस्तरपणे करुया...

चीनचे संरक्षण बजेट भारतापेक्षा साडेतीन पटीने अधिक

भगवान बुद्धांनी जगाला जगण्याचा मार्ग दाखवला : मोदी
भारताचे एकूण सैन्यदल  जवळपास 34 लाख आहे. यात लष्कर, वायुदल आणि नौदलाचा समावेश आहे. तर चीनकडे जवळपास 27 लाख सैन्यदल आहे. चीनचे सैन्यदल अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज आहे. भारत आपल्या लष्करावर 71 अब्ज डॉलर खर्च करतो. तर चीन भारतापेक्षा जवळजवळ साडेतीन पट अधिक लष्करावर खर्च करतो. चीन वर्षाला 291 अब्ज डॉलर आपल्या सैन्यावर खर्च करतो. आण्विक शस्त्रास्त्रांमध्येही भारत चीनपेक्षा खूप मागे आहे. चीनकडे 320 आण्विक अस्त्रे आहेत. तर भारताकडे 150 आण्विक अस्त्रे आहेत.

भारताकडे सध्या 692 लष्करी हेलिकॉप्टर आहेत. तर चीनकडे 1004 लष्करी हेलिकॉप्टर आहेत. रणगाड्यांच्या बाबतीत चीन भारतापेक्षा खूप पुढे आहे. चीनकडे एकूण 13,050 रणगाडे आहेत, तर भारताकडे 4,187 रणगाडे आहेत. शस्त्रसज्ज वाहने भारताकडे 2815 आहेत, तर चीनकडे ते तब्बल 40 हजारांपेक्षाही अधिक आहेत. भारताकडे लढाऊ विमानांची संख्या 520 आहे, तर चीनकडे एकूण 1,222 लढाऊ विमाने आहेत. नुकतेच भारताने रशियासोबत संरक्षण करार केला आहे. त्यानुसार रशिया भारताला 33 सुखोई आणि मिग लढाऊ विमाने देणार आहे. भारताकडे 694 अॅटक एअरक्राफ्ट आहेत, तर चीनकडे ते 1,564 आहेत.

चीनचे हिंद महासागरावर वर्चस्व

भारत आणि चीन या दोन्ही देशांना विस्तिर्ण समुद्र किनारा लाभला आहे. शिवाय चीनची हिंद महासागरात वर्चस्व गाजवण्यासाची मनिषा लपून राहिलेली नाही. समुद्रभागात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी चीनने चांगली तयारी केली आहे. चीनकडे एकूण 76 पाणबुड्या आहेत, तर भारताकडे 16 पाणबुड्या आहेत. टेहळणीसाठी या पाणबुड्यांचा वापर महत्वाचा ठरतो. शिवाय चीनकडे 714 युद्धनौका आहेत, तर भारताकडे 295 युद्धनौका आहेत.

....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

शस्त्रास्त्रांची संख्या लक्षात घेता चीन आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे. तसेच 1962 च्या लढाईत चीनने आपल्याला मात दिली आहे. असे असले तरी चीनने 1979 साली  व्हिएतनामसोबत शेवटचे युद्ध लढले होते. तेव्हापासून चीनला मैदानी युद्धाचा जास्त अनुभव नाही. तर भारताला मैदानी युद्धाचा दिर्घ अनुभव आहे. तसेच भारतीय लष्कर मोठ्या संख्येने पाकिस्तान आणि चीन या दोन देशांच्या सीमा भागात तैनात आहे. शिवाय भारतीय जवानांना पाहाडी युद्धाचा चांगला अनुभव आहे. तर चीनचे सैन्य त्याला लागून असलेल्या प्रत्येक देशाच्या सीमेवर तैनात आहे. त्यामुळे चीनचे सैन्य विखूरलेले आहे. दरम्यान, युद्ध हे केवळ सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या साह्याने जिंकले जात नाही, तर योग्य रणनीतीने जिंकले जाते. याला इतिहास साक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT