Rahul Gandhi and Narendra Modi 
देश

...तर काँग्रेसने राष्ट्रपतीपदासाठी मूर्मूंना पाठिंबा का दिला नाही? मोदींचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य गुजरातमधील आदिवासीबहुल दाहोद येथील निवडणूक प्रचारसभेला संबोधित केले. आदिवासी समाजाची एवढी काळजी होती, तर काँग्रेसने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा का दिला नाही, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. (Narendra Modi news in Marathi)

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा उल्लेख करून मोदी म्हणाले, 'एक माणूस सत्तेत परतण्यासाठी पायी प्रवास करत आहे. आपल्या भाषणांमध्ये ते आदिवासी समाजाविषयी बोलतात. मी त्यांना विचारू इच्छितो की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या महिला आदिवासी उमेदवाराला पाठिंबा का दिला नाही? उलट मूर्मू यांचा पराभव करण्यासाठी आपला उमेदवार उभा केला.

आदिवासी समाजातील कुणाला अध्यक्ष करण्याचा विचार काँग्रेसने कधीच का केला नाही? भाजपनेच केवळ आदिवासी समाजातील व्यक्तीलाच नव्हे तर महिलेला राष्ट्रपती बनवून संपूर्ण जगाला एकतेचा संदेश दिला,' असं मोदी म्हणाले. मोदी पुढं म्हणाले की, आता येथे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून, त्यातून रेल्वे इंजिन निर्मितीचा कारखाना तयार होणार आहे. ही इंजिन इतर देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत. या मोठ्या गुंतवणूकीचा फायदा शेवटी स्थानिक लोकांना होईल.

हेही वाचा Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

सुरत जिल्ह्यातील आदिवासीबहुल महुवा येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की, आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. पण भाजप त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आदिवासींच्या सक्षमीकरणासाठीचे कायदे सौम्य केल्याचा आरोपही राहुल यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT