

Tim David | RCB vs CSK | IPL 2026
Sakal
RCB vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला जात आहे. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात बंगळुरूसाठी टीम डेव्हिड,देवदत्त पडिक्कल, रजत पाटिदार आणि फिल सॉल्ट यांनी चांगली फटकेबाजी केली.
त्यामुळे बंगळुरूने चेन्नईसमोर २५१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांकडून तब्बल १९ षटकार मारण्यात आले.