Why Sushma Swaraj Called to be Super Mom Of India ? esakal
देश

Sushma Swaraj Death Anniversary: सुषमा स्वराज यांना 'Supermom Of India' का म्हटले जाते ?

पूर्व विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना Super Mom Of India का म्हटले जाते ? त्यामागचं कारण आपण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

सुषमा स्वराज यांची गणना त्या राजनेत्यांमध्ये केली जाते ज्यांनी त्यांच्या कामगिरीने आणि भाषणाने जगभऱ्यात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सीमेपलीकडच्याही लोकांची मदत करायला सुषमा स्वराज कधी विचार करत नव्हत्या. विदेश मंत्री असताना त्यांनी युनायटेड नेशनमध्ये (UN) अनेक मुद्यांवर मानवी दृष्टीकोणाचे उदाहरण देत प्रश्न उपस्थित केले होते. आज सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी आहे. संस्कृत आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेणाऱ्या पूर्व विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना 'Super Mom Of India' का म्हटले जाते त्यामागचं कारण आपण जाणून घेऊया. (Why Sushma Swaraj Called to be Super Mom Of India ?)

पाच वर्षात स्वराज यांनी ९० हजारपेक्षा जास्त भारतीयांना केली मदत

सुषमा स्वराज यांच्या काम करण्याची शैली फार वेगळी होती. याच कारणाने हाय प्रोफाईल मानलं जाणारं विदेश मंत्रालय नंतर भारतीयांचं मंत्रालय मानल्या जाऊ लागलं. या मंत्रालयाचं खरं उद्देश्य विदेशात अडचणींचा सामना करणाऱ्या भारतीयांचं रक्षण करणं देखील होतं. सुषमा स्वराज यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात १८६ देशांत अडकलेल्या ९० हजार पेक्षा अधिक भारतीयांना मदत केली होती. आणि याच कारणाने जेव्हा काही महिन्यांआधी युक्रेन आणि रूस युद्धात जेव्हा भारतीय नागरिक अडकलेत तेव्हा त्यांना सुषमा स्वराज यांची आठवण झाली.

सुषमा स्वराज यांना सुपर मॉम नाव कसं मिळालं ?

मोदी सरकार येण्याअगोदर विदेशमंत्रीपदी असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी देश विदेशातील लोकांची मनं जिंकली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी देश विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत पोहोचवत मानवतेचं कर्तव्य पार पाडलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकदा म्हटले होते की, 'माझी माणसं मंगळावर जरी अडकली असणार तरी तिथेही भारतीय दूतवास त्यांच्या मदतीला येतील.' आणि त्यांनी ते करूनही दाखवलं. सोशल मीडियावर अडचणीत अडकलेल्यांच्या एका ट्विटवरून मदतीसाठी विमान पाठवणाऱ्या सुषमा यांना त्यांच्या या मदतगार स्वभावासाठी आणि कामगिरीसाठी वॉशिंग्टन पोस्टने सुपरमॉम असं नाव दिलं होतं. पाकिस्तान असो की यमन युद्धात फसलेले भारतीय, त्यांनी सगळ्या भारतीयांना सुखरूप वापस आणलं.

भारतीयांसाठी थांबवलं होतं युद्ध

२०१५ मध्ये यमन मध्ये सौदी गठबंधन सेना आणि हूती विद्रोहांमध्ये युद्ध चालू होतं. या युद्धामध्ये अनेक भारतीय कामगार अडकले होते. त्यांनी सुषमा स्वराज यांना मदतीची हाक मारताच सुषमा मदतीस पुढे झाल्या होत्या. या युद्धा दरम्यान कोणत्याच देशाचं विमान तेथे पोहोचणं शक्य नव्हतं. मात्र सुषमा यांच्या पुढाकारानं भारत सरकारनं सौदी अरबमध्ये चाललेलं युद्ध थांबवण्याचे आदेश दिले होते. या युद्धात अडकलेल्या ५ हजार भारतीयांना त्यांनी सुखरूप भारतात आणलं. हा किस्सा 'मिशन राहत' म्हणून ओळखलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT