Congress Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi : नेहरूंचा वारस म्हणवल्या जाणाऱ्यांचं आडनाव गांधी का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत राहुल गांधींना हा प्रश्न विचारला आहे..

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सध्या संसदेमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंचं आडनाव लावायला लाज वाटते का, असा प्रश्न राहुल गांधींना विचारला आहे. खरंच गांधी परिवार नेहरू हे आडनाव का लावत नाही? जाणून घ्या.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

“कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केस उभं राहतात. आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिलं गेलं असेल. ते आम्ही ठीक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास का भिती वाटते. का नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते.”

इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्याशी 1942 मध्ये विवाह केला होता. ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी सभागृहात नेहरूंच्या राजकारणाचा आणि राज्यकारभाराचा सतत विरोध केला. फिरोझ गांधी यांचे वास्तविक फिरोझ जहांगीर घांधे असे होते असे सांगितले जाते. फिरोझ गांधी यांचा जन्म पारशी कुटुंबामध्ये झाला होता. त्याचे पालक फारदून जेहांगीर घांधे आणि रातीमाई हे बॉम्बेमध्ये राहत होते. 1930 मध्ये आपले शिक्षण सोडून दिल्यानंतर फिरोझ घांधे यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रवेश केला.

याचवेळी महात्मा गांधी यांच्या विचाराने संपूर्ण भारत प्रेरित झाला होता. महात्मा गांधी या महात्मानं सगळा भारत ढवळून काढला होता. अनेक तरुण गांधीच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेत होते. याच काळात फिरोज गांधी महात्मा गांधीच्या विचाराने प्रेरित झाले आणि त्यांनी आपले आडनाव घांधे बदलून घेऊन गांधी असे करण्याचा निर्णय घेतला व ते पुढे फिरोज गांधी या नावाने ओळखले जाऊ लागले, असा उल्लेख फ्रँक कॅथरिन यांच्या 'द लाईफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी या पुस्तकात सापडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT