Tea Rate Increase News : वाढत्या महागाईचा फटका आता सर्वसामान्यांच्या रोजच्या चहावरही बसणार आहे. गॅस दरवाढ, इंधन टंचाई आणि वाढलेले खर्च यामुळे चहाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय टी कॉफी असोसिएशनने घेतला आहे..टी कॉफी असोसिएशनच्या निर्णयानुसार आता प्रति कप चहामागे १ रुपयाने दरवाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे चहा पिणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला हलका फटका बसणार असला, तरी वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे..असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅसचे दर वाढणे, काही ठिकाणी गॅसची टंचाई, तसेच इतर साहित्याचा वाढलेला खर्च यामुळे चहा विक्रेत्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दरवाढ करणे अपरिहार्य झाले..Moringa Green Tea: बुडत्या शेतीला ग्रीन टीने दिली ‘उमेद’; शेवग्यापासून तयार ग्रीन टी ब्रँड म्हणून येतोय उदयास.मुंबईत टी कॉफी असोसिएशनअंतर्गत सुमारे ६ हजार चहा विक्रेते कार्यरत असून, सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. दरवाढ झाली असली तरी ग्राहकांना दर्जेदार चहा देण्याचा आमचा निर्धार कायम राहील, असेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.