Wife beaten up by husband as she declined sex on wedding night at gujrat 
देश

...म्हणून मधूचंद्राच्या रात्रीच केली मारहाण

वृत्तसंस्था

अहमदाबादः मधूचंद्राच्या रात्री पत्नीने शरीर संबंधास नकार दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी प्रियांका तिवारी हिने पती धर्मेंद्र शर्मा विरोधात कृष्णनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. प्रियांकाने तक्रारीत म्हटले आहे की, 'विवाह झाल्यानंतर विधी व स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात झाला. दिवसभरातील विविध विधींमुळे थकले होते. झोपण्यासाठी रात्री खोलीमध्ये गेले होते. पती धर्मेंद्र सतत शरीर संबंधाची मागणी करत होते. परंतु, आज मी खूप थकल्याचे त्यांना सांगत होते. पती चिडले व शिवीगाळ करत मला मारहाण करण्यास सुरवात केली. शिवाय, माझे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा आरोपही पतीने केला. पहिल्या दिवशी झालेल्या भांडणामुळे तणाव निर्माण झाला होता. यामुळे माझी मानसिक स्थिती चांगली नव्हती. दुसऱ्या दिवशीही पतीने मला मारहाण केली. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून पहिल्या मजल्यावर असलेले सासरे आणि अन्य नातेवाईक मदतीसाठी धावून आले.

प्रियांकाने घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलमातंर्गत तक्रार दाखल केली असून, पुढील तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT