wife called the husband impotent uttar pradesh wife called the husband impotent uttar pradesh
देश

मधुचंद्रानंतर पत्नीने पतीला म्हटले नपुंसक; मग घडला हा प्रकार...

सकाळ डिजिटल टीम

शाहजहांपूर : मधुचंद्रानंतर (सुहागरात) पत्नीने पतीला नपुंसक (impotent) म्हटले. पतीला नपुंसक म्हटल्याने सासरच्यांनी तिला मारहाण केली. यामुळे चिडलेल्या पत्नीने पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये घडली. (wife called the husband impotent uttar pradesh)

प्राप्त माहितीनुसार, पुवाण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तरुणीचा विवाह ५ जून रोजी पोलिस ठाणे सदर बाजार भागातील तरुणाशी झाला होता. या लग्नात वधूच्या कुटुंबीयांनी दहा लाख रुपये हुंडाही दिला होता. मधुचंद्राच्या दिवशी नवरा नपुंसक असल्याचे वधूला समजले. याची माहिती तिने ननदला दिली. यामुळे सासरच्यांनी तिला मारहाण केली.

‘सासरच्या लोकांनी मारहाण केली. पती नपुंसक (impotent) असल्याचे कोणालाही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली’ असे तिने सांगितले. ठार मारण्याची धमकी (Threat) दिल्याने गप्प राहिली. महिला माहेरी आल्यावर घरच्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी पती, सासरा, मेहुणा, भावजय अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पती आणि सासरच्या मंडळींनी काही गोष्टी लपवून फसवणूक करून लग्न केले. तसेच मारहाण करून हुंड्याची मागणी केली, अशी तक्रार पत्नीने दिले. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे एसपी ग्रामीण संजीव बाजपेयी यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात घडला होता असाच प्रकार

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात मधुचंद्राच्या रात्री वराला वधूच्या पोटावर टाके दिसले. थोडी शंका आली. परंतु, नवरा काहीही बोलला नाही. लग्नानंतर काही दिवसांनी पत्नी माहेरी गेली. मात्र, बरेच दिवस झाले तरी पती तिला घेण्यासाठी गेला नाही. दुसरीकडे पत्नीने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. तपासात गुंतलेल्या पतीला लग्नापूर्वी पत्नीने अशोकनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्याचे समजले. पतीने माहितीच्या अधिकाराचा (आरटीआय) सहारा घेतला. आरटीआयमधून मिळालेली माहिती पाहून ते थक्क झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT