देश

बलात्कार कायदेशीर करा; दक्षिणेतील निर्मात्याची मुक्ताफळे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता दक्षिणेतील चित्रपट निर्माता डॅनिअल श्रवण याने याबाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने बलात्कार कायदेशीर करा, अशी मागणी केली आहे. तसेच तरूणींनी आपल्या पर्समध्ये कंडोम बाळगायला हवे, असेही श्रवण याने पोस्टमध्ये लिहिले.

विशाखापट्टणम येथील डॅनिअल श्रवण या चित्रपट निर्मात्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतची वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. श्रवणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, की तरुणींनी 100 डायल करण्याच्या ठिकाणी आपल्या पर्समध्ये कंडोम बाळगायला हवे. कंडोमचा वापर करत त्यांनी स्वत:चा बचाव करावा. महिलांची सुरक्षा फक्त कंडोममुळे शक्य आहे. निर्भया अॅक्टनुसार नाही. 

तसेच बलात्कार ही गंभीर घटना नाही. मात्र, खून हा अक्षम्य गुन्हा आहे. बलात्कारानंतर होणाऱ्या हत्या रोखाव्यात. बलात्काराच्या या राक्षसी विचारासाठी समाज आणि महिला संघटनाच जबाबदार आहेत. जर न्यायालय, सरकार आणि कायदा बलात्कार करणाऱ्यांना क्षमा करत असेल तर हत्येचा विचार मनात येणार नाही. क्रूर हत्येमागे गुन्हेगाराऐवजी समाज आणि महिला संघटनाच वास्तविकपणे अपराधी आहे. 

पर्समध्ये कंडोम ठेवावे

महिलांनी 100 क्रमांकावर फोन करण्याऐवजी पर्समध्ये कंडोम बाळगावे. कंडोमचा वापर करून स्वत:चा बचाव करावा. महिलांची सुरक्षा फक्त कंडोमवरच आधारित आहे. निर्भया कायद्यावर नाही. 

घरातील महिलांनाही सांगणार

डॅनिअलने याबाबतची फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर त्याला अनेक संतप्त प्रतिक्रियाही मिळत होत्या. त्यामध्ये आपण आपल्या कुटुंबातील महिलांना हा सल्ला देणार का? असा सवाल केला गेला. त्यावर डॅनिअलने उत्तर दिले, की जर माझ्या कुटुंबातील कोणतीही महिला अशाप्रकारच्या कठिण प्रसंगातून जात असेल तर त्यांनाही मी ही गोष्ट नक्कीच सांगेन.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT