Nasal Vaccine of Covid 19 Sakal
देश

Covid 19 Vaccine: नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला अखेर परवानगी; चीन जगात पहिला

थेट स्नायूमध्ये इंजेक्शन न देताच ही लस सुरक्षा देणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना लशीला परवानगी देणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. तिआन्जिनमधल्या कॅनसिनो बायोलॉजिक्स या कंपनीने ही नाकावाटे दिली जाणारी लस तयार केली आहे. यामुळे हाँगकाँगमध्ये आज सकाळी या कंपनीच्या शेअर्समध्ये १४.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

चीनच्या औषध प्रशासाने कॅनसिनोची Ad5-nCoV ही लस आपत्कालिन वापरासाठी बुस्टर डोस म्हणून वापरण्यास परवानगी दिली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीमुळे पेशींची रोगप्रतिकारक्षमतेत वाढ होणार असून थेट स्नायूमध्ये इंजेक्शन न देताच ही लस सुरक्षा देणार आहे.

कोरोनाविरोधात अशा प्रकारे नाकावाटे दिल्या जाणाऱ्या आणखी लसींवर वैज्ञानिक संशोधन करत आहेत. कॅनसिनोकडून सुरुवातीला टोचली जाणारी लस कोरोनाविरोधात ६६ टक्के प्रभावी होती, तसंच गंभीर आजारांवर ९१ टक्के प्रभावी होती. मात्र त्यानंतर सिनोव्हॅक बायोटेक या कंपनीची लसही बाजारात आली. या दोन कंपन्यांनी जगभरात ७७० मिलियनहून अधिक लसी पाठवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT