World’s largest Covid Care facility with 10,000 beds inaugurated in Delhi
World’s largest Covid Care facility with 10,000 beds inaugurated in Delhi 
देश

दिल्लीत उभारले जगातील सर्वात मोठे कोविड शुश्रूषा केंद्र; एवढ्या खाटांची सोय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच नवी दिल्लीतून एक चांगली बातमी समोर आली आहे. नवी दिल्लीतील दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथे जगातील सर्वात मोठे कोविड शुश्रूषा केंद्र उभारण्यात आले आहे. येथिल राधा स्वामी सत्संग ब्यास या धार्मिक संस्थेच्या भव्य मैदानावर हे केंद्र उभारले असून या केंद्राचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या ठिकाणी एकूण १० हजार खाटांची सोय असून, त्यांचा वापर प्रामुख्याने सौम्य लक्षणे दिसणाऱ्या किंवा लक्षणे न दिसणा-या राजधानीतील कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर म्हणून केला जाणार आहे. सरदार पटेल कोविड केअर सेंटर अ‍ॅण्ड हॉस्पिटल असे या केंद्राचे नामकरण करण्यात आले आहे. हे केंद्र अत्यंत आधुनिक व सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. या सुविधा केंद्राचे उद्घाटन दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल यांनी केले आहे.
-------------
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट
-------------
सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !
------------
राधास्वामी सत्संग व्यास संस्थेने सत्संग मेळाव्यांसाठी वापरले जाणारे पटांगण यासाठी उपलब्ध करून दिले. पूर्णपणे वातानुकुलित लोखंडी मंडपाच्या स्वरूपात उभारलेल्या या हंगामी इस्पितळवजा शुश्रूषा केंद्राचा एकूण परिसर १,७०० फूट लांब व ७०० फूट रुंद म्हणजे फूटबॉलच्या २० मैदानांएवढा आहे. येथील एकूण १० हजार खाटा विविध वॉर्डमध्ये विभागलेल्या असून यातील प्रत्येक वॉर्डला लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय लष्कराच्या २० जवानांची नावे देण्यात आली आहेत.

दिल्ली प्रशासनाने सैन्यदलांच्या मदतीने अवघ्या १२ दिवसांत हे सुसज्ज केंद्र उभे केले आहे. या शुश्रूषा केंद्रातील पहिल्या दोन हजार खाटा वापरासाठी लगेच उपलब्ध होणार असून त्यांचे वैद्यकीय व्यवस्थापन भारत-तिबेट सीमा पोलीस या निमलष्करी दलाचे १७० डॉक्टर व ७०० नर्स व अन्य कर्मचारी करतील. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ९७,२०० वर पोहोचली असताना हे केंद्र सुरू झाल्याने मोठी सोय होणार आहे. नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. गेल्या आठवड्यात रोजच्या नव्या रुग्णांची संख्या सरासरी ३, ४०० होती. ती आता कमी होऊन २,६२८वर आली आहे. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. जगात आतापर्यंत एक कोटी १५ लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. पाच लाख ३६ हजार जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT