Narendra Modi 
देश

Narendra Modi : "केरळमध्ये कुस्ती, त्रिपुरात दोस्ती", PM मोदींचा काँग्रेस-डाव्या आघाडीला टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या युतीची खिल्ली उडवली. शनिवारी त्रिपुरातील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आज केरळमध्ये जे पक्ष 'कुस्ती' करत आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी येथे एकत्र आले आहेत. (Narendra Modi news in Marathi)

पीएम मोदी पुढे म्हणाले की, काही इतर पक्षही विरोधकांच्या या आघाडीला पाठिंबा देत आहेत. पण मला जनतेला एवढेच सांगायचं की, तुमचे कोणतेही मत त्यांच्या वाट्याला गेले तर ते त्रिपुराचा विकास अनेक वर्षे मागे घेऊन जातील.

गोमती जिल्ह्यातील राधाकिशोरपूर येथे एका निवडणूक सभेत पंतप्रधान म्हणाले की, जे पक्ष वाईट कारभारासाठी ओळखले जातात ते आज 'देणग्या'साठी हातमिळवणी करत आहेत. हे तेच पक्ष आहेत जे केरळमध्ये 'कुस्ती' लढवत आहेत आणि त्रिपुरामध्ये 'दोस्ती' असल्याचं दाखवत आहेत.

दरम्यान विरोधकांना फक्त तुमच्या मताचे विभाजन करायचे आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी काही छोटे पक्षही त्यांना पाठिंबा देत आहेत. त्यांना असे वाटते की असे केल्याने ते निवडणुकीचा निकाल बदलतील आणि त्यानंतर त्यांना त्यासाठी हवे ते मिळेल, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT