India  Sakal
देश

Year Ender 2022 : नवी ओळख-नवी दिशा; भारतीयांसाठी 'या' घटना ठरल्या अभिमानास्पद!

अनेक आंबट-गोड प्रसंगांनी हे वर्ष संस्मरणीय बनवले.

सकाळ डिजिटल टीम

Year Ender 2022 : अवघ्या काही तासात २०२२ हे वर्ष संपून नव्या वर्षाला सुरूवात होणार आहे.

हे ही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

अनेक आंबट-गोड प्रसंगांनी हे वर्ष संस्मरणीय बनवले. त्यात भारताला या वर्षात अनेक गौरवशाली क्षण पाहण्यास मिळाले. आज आम्ही अशाच देशासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या घटना सांगणार आहोत.

भारताला मिळाले G-20 चे अध्यक्षपद

भारताला यावर्षी G-20 चे अध्यक्षपद मिळाले. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी बाली येथे G-20 चे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले.

इस्रोकडून EOS-06 प्रक्षेपित

यावर्षी 26 नोव्हेंबर रोजी इस्रोने ध्रुवीय उपग्रह EOS-06 प्रक्षेपित केला. भारताचे हे आतापर्यंतचे ५६ वे PSLV आणि या वर्षातील पाचवे प्रक्षेपण होते.

5-G ची जोरदार सुरुवात

भारताने या वर्षी देशात 5-जी नेटवर्क सुरू केले आहे. डॉट तंत्रज्ञानासह 13 मोठ्या शहरांमधून याची सुरुवात करण्यात आली आहे.

भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास

भारतीय महिला हॉकी संघाने यंदाचा FIH महिला राष्ट्र चषक जिंकून इतिहास रचला. संघाने स्पेनचा 1-0 असा पराभव करून चषकावर भारताचे नाव कोरले. या विजयामुळे भारतीय हॉकी संघाचा 2023-24 प्रो-लीगमध्ये खेळण्याचा मार्ग जवळपास सोपा झाला आहे.

आयएनएस विक्रांत

यंदा भारत सरकारने आयएनएस विक्रांत लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट केली. या युद्धनौकेमुळे भारताची लष्करी ताकद प्रचंड वाढली आहे. विशे, म्हणजे ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत मोहिमेचे मोठे प्रतीक म्हणून उदयास आली आहे.

मीराबाई चानूने जिंकले सुवर्णपदक

देशाची वेटलिफ्टर मीराबाई चानूने बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. हा क्षण सर्वच भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT