Yogi_Aatik Ahmed 
देश

"CM योगी शूर, इमानदार"; बुलडोझर चालवल्यानंतर गँगस्टरकडून कौतुकाचा वर्षाव

हत्या, अपहण, खंडणीचे आरोप त्याच्यावर असून तो पाच वेळा आमदारही राहिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एकेकाळचा कुख्यात गँगस्टर आतिक अहमद याचा योगी सरकारच्या काळात सूर बदलला आहे. आतिक अहमदला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता इमानदार आणि शूर दिसू लागले आहेत. कोर्टात सुनावणीसाठी नेत असताना त्यानं योगींचं हे विधान केलं आहे. (Yogi Adityanath is brave honest CM says gangster Atiq Ahmed at Lucknow)

गँगस्टर अतिक अहमद म्हणाला, योगी आदित्यनाथ हे शूर आणि इमानदार मुख्यमंत्री आहेत, ते चांगलं काम करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी गेल्या काही दिवसांपासून माफियाराज संपवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, आतिक अहमद सारख्या लोकांसाठी योगी अडचणीचे ठरले आहेत. या गँगस्टरच्या प्रयागराजमधील अनेक संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे. तसेच त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हेगारी खटले सुरु आहेत.

आतिक अहमदच्या जवळपास सर्वच मालमत्तांवर योगी सरकारनं बुलडोझर चालवले आहेत. ईडी आणि सीबीआयसारख्या चौकशी एजन्सीच्या निशाण्यावर आता तो आहे. मार्च महिन्यात भूमाफिया आतिक अहमद याच्या अवैध प्रॉपर्टी समोर आल्या होत्या. त्यानंर प्रयागराज विकास प्राधिकरणानं त्याच्या अवैध प्लॉटिंगवर बुलडोझर चालवला होता.

कोण आहे आतिक अहमद?

आतिक अहमद एकेकाळी प्रयागराज आणि आजूबाजूच्या भागात मोठी दहशत होती. त्याच्यावर हत्या, अपहरण तसेच लुटी सारखे डझनभर आरोप आहेत. आतिक अहमदवर आजवर ८०हून अधिक खटले दाखल आहेत, असं असतानाही तो ५ वेळा आमदार आणि एक वेळ तो खासदार देखील होता. समाजवादी पार्टी आणि अपना दलमधून त्यानं निवडणूका लढवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT