Uttar Pradesh Crime News esakal
देश

Crime News : अयोध्येतील हनुमान मंदिरात तरुणाची गळा चिरून हत्या

सकाळ डिजिटल टीम

या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) अयोध्येतील हनुमान मंदिरात (Ayodhya Hanuman Temple) एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील कुमारगंज इथं हनुमान मंदिर आहे. या गावात एक तरुण आपल्या आजीच्या घरी आला होता आणि उष्णतेमुळं तो मंदिरात झोपला असता तिथंच त्याचा गळा चिरून खून करण्यात आलाय.

या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तसंच तरुणाच्या गळ्यावर जखमा आढळल्याचंही पोलिस (Uttar Pradesh Police) म्हणाले.

अयोध्या जिल्ह्यातील कुमारगंज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या भूआपूर-देवगावमधील हनुमान मंदिरात एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. पंकज शुक्ला असं तरुणाचं नाव असून त्याचं वय 35 वर्षे आहे. गळा चिरून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या हत्येनंतर कुटुंबातील लोकांनी पोलिसांना माहिती दिलीय. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana: खरीपाच्या उंबरठ्यावर बळीराजा समोर संकटांचा डोंगर;पावसाची अनिश्चितताः महागाईचा फटका आणि वाढत्या खर्चाने शेतकरी हवालदिल

Pune News: जागा हस्तांतरित होण्यापूर्वीच १,५०० झाडांवर कुऱ्हाड?; मुंढवा बॉटनिकल गार्डन प्रकरण गाजले, प्रशासनाला एवढी कसली घाई..

Stock Market Today: जागतिक बाजार घसरले, पण भारतीय बाजार चमकला! सेन्सेक्स 344 अंकांनी उसळला; Meta मुळे 'हा' शेअर तेजीत

Yavatmal Couple Death : लग्नाला झाले होते अवघे 34 दिवस! 24-19 वयाच्या नवविवाहित जोडप्यानं विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, दवाखान्यातून परतले अन्...

Chhatrapati Sambhajinagar:हवाई सफरलाही महागाईची झळ!; छत्रपती संभाजीनगर-नवी मुंबई, बंगळुरू विमानसेवांच्या फेऱ्यांत होणार कपात

SCROLL FOR NEXT