JNU Protest
JNU Protest 
देश

हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही; जेएनयू प्रशासनाचा विद्यार्थ्यांना इशारा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थांना कडक इशारा दिला आहे. कॅम्पसमध्ये हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. इथली शांतता आणि सौहार्द बिघडवणाऱ्या घटनांपासून दूर राहा असं जेएनयू प्रशासनानं विद्यार्थ्यांना म्हटलं आहे. कुलगुरू, रेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर वसतिगृहाला भेट दिली, अशी माहिती रजिस्ट्रार रविकेश यांनी दिली. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दलं आहे.

पोलीस निष्क्रियतेचा आरोप JNUSUने केला

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (जेएनयूएसयू) ने दावा केला आहे की, रविवारी संध्याकाळी संभाव्य हिंसाचाराची पोलिसांना सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ज्यावेळी हिंसाचार झाला तेव्हाही आम्हाला पोलिसांसमोर धमक्या देण्यात आल्या. परंतू त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,” असं विद्यार्थी संघटनेनं म्हटलं आहे.

जेएनयूएसयू आणि इतर संघटनांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला. AISA कार्यकर्त्यांनी पोलिस मुख्यालयाजवळ आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT