rahul gandhi  sakal
देश

Lok Sabha Election : कर्नाटकमध्ये कॉँग्रेसच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहा - राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज कर्नाटकमधील पक्ष संघटना आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी ही तंबी दिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘कर्नाटकमध्ये कॉँग्रेसच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहावे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचाऱ्यांची गय करू नये,’’ अशी तंबी राहुल गांधींनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज कर्नाटकमधील पक्ष संघटना आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी ही तंबी दिली.

कॉँग्रेस मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्र्यांचा त्याचप्रमाणे पक्ष संघटनेतील नेत्यांचाही सहभाग होता.

राज्यात कॉँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले असून विकासकामांसाठी राज्य सरकारच्या खजिन्यात निधी नसल्याची टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मंत्र्यांना फटकारले.

‘विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मतदारांनी कॉँग्रेसला सत्ता सोपविली असल्याने मंत्र्यांवर आरोप झाल्यास तातडीने त्याची चौकशी करून कारवाई करावी,’ असेही राहुल गांधींनी या बैठकीत सांगितले.

या बैठकीनंतर कर्नाटक प्रदेश कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सलीम अहमद पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘सिद्धरामय्या सरकारने पाच गॅरंटी आश्वासनांपैकी चार गॅरंटी योजना पूर्ण केल्या आहेत. राज्यसरकारच्या कामगिरीमुळे लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये २० हून अधिक जागा जिंकेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT