acid attack survivor peon s daughter tops school with 95 in cbse class 10 exams CBSE 10th Result 2023
acid attack survivor peon s daughter tops school with 95 in cbse class 10 exams CBSE 10th Result 2023 sakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE 10th Result 2023 : अॅसिड हल्ल्यातून बचावलेली अंध कफी दहावीमध्ये अव्वल

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : वयाच्या तिसऱ्या वर्षी अॅसिड हल्ल्याचा सामना करावा लागलेल्या अंध मुलीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत चंडीगडमधील शाळेत अव्वल क्रमांक मिळविला. तिने ९५.०२ टक्के गुण मिळविले. कफी असे तिचे नाव आहे. तिचे वडील सचिवालयात कार्यालयीन सहाय्यक आहेत.

भूगोल आवडता विषय असलेल्या कफीची सनदी अधिकारी होण्याची कफीची महत्त्वाकांक्षा आहे. कफीच्या चेहऱ्यावर लहानपणी शेजाऱ्यांनी द्वेषातून अॅसिड फेकले. तिचा संपूर्ण चेहरा भाजला होता. तब्बल सहा वर्षे तिला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.कफीने या भीषण संकटाचा अभ्यासावर मात्र परिणाम होऊ दिला नाही. ब्रेल लिपीच्या माध्यमातून तिने अध्ययन सुरु ठेवले. ती वेगाने वाचन करते.

कफीने आपल्या पालकांचे आभार मानले. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचाही तिने आवर्जून उल्लेख केला. कफीचे पिता पवन म्हणाले की, मुलीवर आकाश कोसळल्यानंतर माझे मनोधैर्य खचले होते. एका भल्या माणसाच्या सल्ल्यामुळे मी कफीला शिकवायचे ठरविले. आज कफीने या निर्णयाची सिद्धता केली आहे. यापुढे तिला जे काही करायचे आहे त्यासाठी मी अहोरात्र काम करेन आणि तिचे स्वप्न साकार व्हावे म्हणून झटत राहीन.

कफीची माता म्हणाली की, कफी अभ्यासात हुशार आहे याचा मला अभिमान वाटतो. आज तिच्यामुळे आम्हाला समाजात ताठ मानेने जगण्याची संधी मिळाली आहे.

युट्यूब, इंटरनेटचा उपयोग

कफीने युट्यूब तसेच इंटरनेटच्या मदतीने अभ्यास केला. या दोन माध्यमांचा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी बराच उपयोग झाल्याचे तिने आवर्जून नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT