Scholarship Sakal
एज्युकेशन जॉब्स

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

मीनाक्षी गुरव

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

पुणे - इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी तब्बल सात लाख २१ हजार ५९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

राज्यातील ४८ हजार ८० शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. इयत्ता पाचवीच्या (पूर्व उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तब्बल चार लाख १७ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख तीन हजार ६९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

या परीक्षेचे प्रवेशपत्र एक जुलैपासून संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्याचे वितरित करावे. परीक्षार्थी आणि पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन दराडे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. आता मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. शाळा-शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची जोरदार तयारी करून घेतली जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आली असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा परीक्षेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी नोंदणी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची आकडेवारी -

- एकूण नोंदणी केलेल्या शाळा : ४८,०८०

- इयत्ता पाचवीचे विद्यार्थी : ४,१७,८९४

- इयत्ता आठवीचे विद्यार्थी : ३,०३,६९७

- एकूण विद्यार्थी : ७,२१,५९१

- परीक्षा केंद्रांची संख्या : ५,७०७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT