admission
admission sakal
एज्युकेशन जॉब्स

तंत्रशिक्षणचे प्रवेश सोमवारपासून; अलॉटमेट यादी जाहीर

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमामध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. दहावीचा बंपर निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतनमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत जास्त प्रवेश होणार असल्याचे संकेत आहे. त्यानुसार राज्यात १ लाख २५ हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. काल प्रवेशासाठी तात्पूरती गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. सोमवारी अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार असून १८ तारखेला प्रवेशासाठी अलॉटमेंट देण्यात आले. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत विद्यार्थी २३ तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतील.

तंत्रनिकेतनच्या नोंदणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे ३० जूनपासून नोंदणीस सुरुवात करण्यात आली. यानंतर दहावीच्या निकालाची घोषणा १६ जुलैला करण्यात आली. यावेळी विभागात ९९.८४ तर राज्यात ९९.९५ टक्के निकाल लागला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय ३ ऑगस्टला बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. त्यातही ९९.६२ टक्के विभागाचा निकाल लागला. दोन्ही परीक्षांमध्ये गुणांचा टक्का वाढल्याने नोंदणीची संख्या चांगलीच वाढली. ७ सप्टेंबरपर्यंत विभागात ११ हजार ५३ तर राज्यात १ लाख २५ हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. सोमवारी (ता.१३) अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. आज शनिवारी पहिल्या फेरीचे अलॉटमेंट करण्यात आले. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत विद्यार्थी २३ तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतील. २४ ला रिक्त जागांची यादी तर २५ सप्टेंबरला त्यासाठी ऑप्शन भरता येईल. त्यानंतर ३० सप्टेंबरला जागांचे अलॉटमेंट करण्यात येईल. १ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

  • १८ सप्टेंबर - अलॉटमेंट

  • २४ सप्टेंबर - दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी

  • २५ सप्टेंबर - ऑप्शन भरणे

  • ३० सप्टेंबर - अलॉटमेंट

  • १ ऑक्टोबर - वर्ग सुरू करणे

  • १४ ऑक्टोबर - महाविद्यालयांना प्रवेश नोंदणीचा शेवटला दिवस

निकाल वाढल्याने प्रवेशाला प्राधान्य

राज्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या १ लाख १७ हजार ८२४ जागा आहेत. तर नागपूर विभागात ५० महाविद्यालयांत १३ हजार १२६ जागांचा समावेश असून गेल्या वर्षी ६ हजार ४९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने सुमारे ४० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र यावर्षी दहावीचा १०० टक्के निकाल लागल्याने या अभ्यासक्रमात ८० टक्के विद्यार्थी प्रवेशाला प्राधान्य देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तंत्रनिकेतनच्या जागा -

नागपूर विभाग - १२,८००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT