Career Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : बारावी नंतर ऑफबीट करिअर करायचे आहे? मग, 'या' कोर्सची करा निवड

ऑफबीट करिअरमध्ये अनेक प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : दहावी किंवा बारावीत गेल्यावर अनेकांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे? असा प्रश्न पडतो. मग, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स इत्यादी नेहमीचे पर्याय निवडले जातात.

मात्र, जर तुम्हाला करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काहीतरी वेगळी वाट निवडायची असेल तर मग तुम्ही ऑफबीट करिअरमधील पर्यायांचा विचार करायला हरकत नाही.

ऑफबीट करिअरमध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आजच्या घडीला उपलब्ध आहेत. या ऑफबीट करिअरमध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र, या कोर्सेसची तुम्हाला आवड असायला हवी. मग, बघा तुमच्या करिअरची गाडी कशी सुसाट पळते ते.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही ऑफबीट करिअरमधील कोर्सेसची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या ऑफबीट कोर्सेसबद्दल.

पेंट टॅक्नोलॉजी

सध्याच्या घडीला पेंट टॅक्नोलॉजीमध्ये करिअरच्या अमाप संधी उपलब्ध आहेत. मागील काही वर्षांमध्ये या पेंट टॅक्नोलॉजीमध्ये अनेक नावीन्यपूर्ण बदल झाले आहेत. (Paint technology)

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे, आवश्यक आहे. शिवाय, पेंट टॅक्नोलॉजीमध्ये अनेक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल उद्योग आणि होम फर्निशिंग उद्योगांव्यतिरिक्त पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात.

कॉस्मेटिक्स अ‍ॅण्ड परफ्यूम टॅक्नोलॉजी

कॉस्मेटिक्स अ‍ॅण्ड परफ्यूम टॅक्नोलॉजी हे क्षेत्र तसे फार जुने आहे. मात्र, या क्षेत्रात  आज ही प्रोफेशनल्स लोकांची कमतरता आहे. त्यामुळे, या क्षेत्रात कामाच्या अमाप संधी आहेत, यात काही शंका नाही. (Cosmetics and Perfume Technology)

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर, पदवीनंतर तुम्ही कॉस्मेटिक्स आणि परफ्यूम टॅक्नोलॉजीमध्ये पीजी डिप्लोमा करू शकता. हा कोर्स केल्यानंतर, तुम्हाला मोठ्या परफ्यूम हाऊसमध्ये किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळू शकते. या क्षेत्रात जास्त अनुभव आल्यावर तुम्हाला परदेशात ही परफ्यूम तज्ज्ञ म्हणून नोकरी मिळू शकते.

पेपर टॅक्नोलॉजी

प्लॅस्टिकवर लावण्यात आलेल्या बंदीमुळे या क्षेत्राला चांगलाच बूस्ट मिळाला आहे. मागील काही वर्षांमध्ये या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून नवनवीन टॅक्नोलॉजीचा वापर देखील वाढला आहे. (Paper Technology)

सध्या देशातील अनेक आयआयटीमध्ये पेपर टॅक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा आणि डिग्रीचे कोर्स उपलब्ध आहेत. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो, किंवा ते स्वत:चा स्टार्टअप देखील सुरू करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Jadeja : 'वनडेत खेळायचंय, पण कर्णधार, कोच आणि...'ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यावर अन् वर्ल्ड कपबद्दल जडेजाने सोडलं मौन

Singer Kumar Sanu: गायक कुमार सानू यांची उच्च न्यायालयात धाव; 'हे' आहे प्रकरण

2026 Numerology Prediction : कुणाची होणार फसवणूक तर कुणाला मिळणार यश ! मूलांकानुसार जाणून घ्या नव्या वर्षांचं भविष्य

IND vs WI 2nd Test: एक सुटला, दोनदा सुटला, पण तिसऱ्यांदा पकडलाच, केल राहुलने घेतलेल चंद्रपॉलचा कॅच पाहिला का?

Latest Marathi News Live Update : भारत नेहमीच बांधकाम करण्यास मदत करतो, तर पाकिस्तान नष्ट करतो - शायना एनसी

SCROLL FOR NEXT