Agneepth Scheme Sakal
एज्युकेशन जॉब्स

अग्निपथ’ योजनेतून तरुणांना मिळणार देशसेवेची संधी

सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ योजनेतून साकार होणार.

सकाळ वृत्तसेवा

सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ योजनेतून साकार होणार.

पुणे - सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे तरुणांचे स्वप्न आता ‘अग्निपथ’ योजनेतून साकार होणार आहे. अग्निपथमध्ये निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे तिन्ही सशस्त्र दलांत देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे भारतीय लष्कर शारीरिकदृष्ट्या बळकट होणार असून, जवानांचे सरासरी वय ३२ वरून २६ होणार आहे’ असा विश्वास लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी बुधवारी (ता. १५) व्यक्त केला.

साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. भरती होणाऱ्या तरुणांपैकी २५ टक्के तरुणांना चार वर्षांचा सेवा कालावधी संपल्यानंतर सेवेत कायम केले जाणार आहे. तसेच यापुढे लष्कराची भरती प्रक्रिया आता ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातूनच होणार आहे, वालिया यांनी सांगितले. ‘अग्निपथ’ योजना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (ता.१४) तिन्ही संरक्षण दलप्रमुखांच्या उपस्थितीत जाहीर केली. या योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल वालिया बोलत होते.

‘या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व जिल्ह्यांमधून अग्निविरांची भरती केली जाईल. या तरुण अग्निविरांमुळे लष्करात उत्साह, चैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण होणार आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये राष्ट्रवादाचा प्रसार होणार असून, त्यांच्या चार वर्षांच्या लष्करी सेवेनंतर समाजाला कुशल मनुष्यबळ मिळणार आहे,’ असे वालिया यांनी नमूद केले.

सहा महिन्यांचे प्रशिक्षण -

ब्रिगेडियर पंकज नंदा यांनी ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया आणि सेवा पॅकेजची माहिती दिली. येत्या ९० दिवसांत अग्निविरांची पहिली तुकडी लष्करात भरती होईल. त्यानंतर त्यांना सहा महिने प्रशिक्षण दिले जार्इल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT