Blended BSC  sakal
एज्युकेशन जॉब्स

Blended BSC : आंतरविद्याशाखीय शिक्षणाचा अभिनव प्रयोग

‘बीएस्सी ब्लेंडेड,’ ‘बीए इन लिबरल आर्ट’ला पसंती....पारंपरिक विद्या शाखेची रोजगारक्षमता कमी झाल्याने आता आंतरविद्याशाखीय शिक्षणात नवे प्रयोग केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘बीएस्सी ब्लेंडेड’ आणि ‘बीए इन लिबरल आर्ट’ हे पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पारंपरिक विद्या शाखेची रोजगारक्षमता कमी झाल्याने आता आंतरविद्याशाखीय शिक्षणात नवे प्रयोग केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘बीएस्सी ब्लेंडेड’ आणि ‘बीए इन लिबरल आर्ट’ हे पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

१) ‘बीएस्सी ब्लेंडेड’ (संशोधन)

विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमांपेक्षा हा अभ्यासक्रम वेगळा आहे. आंतरविद्याशाखीय पद्धतीने शिक्षण असलेले हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. विद्यापीठ आणि मेलबर्न विद्यापीठाच्या सहकार्याने चालवला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान या विषयांमध्येही पदवी आहे.

  • ‘बीएस्सी ब्लेंडेड’चे वेगळेपण

  • मेलबर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठात संशोधन शिबिर

  • अंतिम वर्षातील विद्यार्थी, विद्यापीठांचे विभाग, आयुका, आयसर, एनसीएल, एनसीसीएस, सीडॅक संस्थांमध्ये संशोधन प्रकल्प करतील.

  • ‘पीएच.डी.’साठी पात्र : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ७.५ सीजीपीए असलेले विद्यार्थी पीएच.डी.साठी अर्ज करू शकतात.

  • बहुतेक विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांत संशोधनाची संधी मिळाली आहे.

प्रवेश परीक्षा

अकरावी आणि बारावी एनसीईआरटी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्रावर आधारित मूलभूत प्रश्‍नांवर आधारित प्रवेश परीक्षा

एकूण जागा : ६४

‘बीएस्सी ब्लेंडेड’चे वेगळेपण

  • मेलबर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठात संशोधन शिबिर

  • अंतिम वर्षातील विद्यार्थी, विद्यापीठांचे विभाग, आयुका, आयसर, एनसीएल, एनसीसीएस, सीडॅक संस्थांमध्ये संशोधन प्रकल्प करतील.

  • ‘पीएच.डी.’साठी पात्र : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ७.५ सीजीपीए असलेले विद्यार्थी पीएच.डी.साठी अर्ज करू शकतात.

  • बहुतेक विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांत संशोधनाची संधी मिळाली आहे.

२) बीए लिबरल आर्ट

कला शाखेतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या फार कमी संधी उपलब्ध असतात. तसेच अभ्यासक्रमही कौशल्याभिमुख नसतो. म्हणून, विद्यापीठात ‘एनईपी’वर आधारित असलेला हा अभ्यासक्रम जुलै २०१९ मध्ये सुरू करण्यात आला आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षण असलेल्या या अभ्यासक्रमाचा कौशल्याभिमुखतेवर भर आहे. सर्जनशील लेखन, औपचारिक आणि उपयोजित लेखन, सायबर सुरक्षा, निर्देशात्मक डिझाइन, फोटोशॉप, एक्सेल, ऑडिओ संपादन, सादरीकरण कौशल्ये, वक्तृत्व, चर्चा आणि वादविवाद कौशल्ये, डेटा संकलनतंत्र आदी विषय शिकविले जातात.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये...

  • श्रेयांकावर आधारित चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे.

  • त्यांच्या स्पेशलायझेशनच्या विषयांमध्ये मास्टर्स प्रोग्रॅमसाठी विद्यार्थी पात्र आहेत.

  • आधीच्या विद्यार्थ्यांना युरोपमधील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर प्रवेश मिळवला आहे.

  • विद्यार्थी एमबीए, कायदा आणि माध्यम क्षेत्रांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्र.

  • पदवीनंतर थेट संशोधनाच्या संधी मिळू शकतात.

प्रवेश परीक्षेच्या अर्जाचे संकेतस्थळ :

https://campus.unipune.ac.in किंवा

सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा.

अर्जाची अंतिम मुदत : २० मे २०२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT