Corporate Field
Corporate Field Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर अपडेट : कॉर्पोरेट जगतामध्ये काम करताना ‘काय टाळावे?’

सकाळ वृत्तसेवा

- अंकित भार्गव

चांगल्या करिअरसाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा आपण विचार करणार आहोत. अनेक लोकांना असे वाटते की कंपनी म्हणजे जणू काही त्यांच्या महाविद्यालयाचाच एक भाग आहे. हे स्वीकारार्ह नाही. कॅम्पसमध्ये बऱ्याचदा वेळ वाया घालवणारे लोक दिसून येतात. त्यामुळे आपली प्रतिमा ‘चालढकल करणारी व्यक्ती’ अशी होणार नाही हे आपले पहिल्या दिवसापासून उद्दिष्ट असले पाहिजे.

सहकारी आणि मित्र यांच्यामध्ये गल्लत करू नका. महाविद्यालयामध्ये तुम्हाला आयुष्यभराचे मित्र मिळतात. परंतु कॅम्पसमध्ये तुमची सहकाऱ्यांबरोबर भेट होते. तुम्ही एकाच संस्थेमध्ये काम करत असता तोपर्यंत हे नातं टिकून असतं. मित्र आणि सहकारी या नात्यांमध्ये गल्लत करणे ही अत्यंत घातक आणि तितकीच धोकादायक चूक अनेक लोक करतात.

व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीमध्ये इतरांबाबत आपली मते नोंदवताना विवेकबुद्धी आवश्यक आहे. इतरांबाबत आपली मते बनवताना त्यांची परिस्थिती समजून घेणे तसेच त्याविषयी सहानुभूती असणे आणि पूर्वग्रह न बनवणे हे चांगलेच आहे. परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे तुमची काही मते असली तरी मौखिक संवादातून किंवा कृती अथवा देहबोलीतून ती व्यक्त होऊ न देणे. तुम्ही तुमच्या मनाला आवरू शकत नसाल तर किमान तुमचे बोलणे आणि कृती यांना आवर घाला. आपल्या मनाला नकारात्मक गोष्टींमध्ये अडकू न देणे हे करिअरमधील प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे.

इतरांनी मदत मागितलेली नसतानाही त्यांना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे अनेकांना वाटत असते. या संदर्भात एखाद्या व्यक्तीचा हेतू चांगला असेल किंवा नाही याबाबत संदिग्धता असली तरी अंतिमतः अशा वागण्यामुळे संबंधित व्यक्ती अस्वस्थच होते. तुम्हाला एखाद्याबाबत आपले मत नोंदवायचेच असल्यास खालील गोष्टी तपासून घ्या. त्या व्यक्तीला आपले मत सांगणे आवश्यक आहे, याची तुम्हाला खात्री आहे का? ते सकारात्मक आहे का? हे मत नोंदवण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती आहात का? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे होय अशी असतील तर अगदी खासगीमध्ये आपले मत नोंदवा.

आपल्याला कार्यालयामध्ये थोडासा निवांत वेळ असल्यास त्याला एखाद्या कॉलेज पार्टीचे स्वरूप येत कामा नये. ऑफसाईटमध्ये असताना तुम्हाला थोडा निवांतपण मिळतो. कामाशिवाय इतर गोष्टींवर बोलता येते. असे असले तरी आपण ऑफसाईटमध्ये आहोत म्हणजे ऑफिसच्याच एका अन्य भागात आहोत याचे भान राखले पाहिजे.

तुम्हाला एखादी संस्था पसंत नसल्यास त्यामध्ये राहून आपल्याला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करण्याऐवजी ती सोडणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही काम करत असलेली संस्था तुमच्या उद्दिष्टांची पूर्ती करत नसेल किंवा तिथे तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळत नसतील तर त्या संस्थेमध्ये काम करायचे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. आपल्या कामाच्या शैलीमुळे कोणत्याच संस्थेच्या कामाचे नुकसान होता कामा नये.

संस्थेमध्ये आपल्याला असलेला मान किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करणाऱ्या काही ओळी लिहून मी या विषयाचा समारोप करतो. “एखादी व्यक्ती कुणाच्या संगतीमध्ये आहे यावरून त्याची/तिची ओळख ठरते. तुम्ही ज्यांच्या संगतीमध्ये आहात त्यांच्यामुळे तुम्हाला जीवनात मान मिळतो. त्यामुळे विचारपूर्वक वागून मान प्राप्त करा.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT