Teachers
Teachers Sakal
एज्युकेशन जॉब्स

Teachers Award : राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा; पुणे जिल्ह्यातील 4 शिक्षकांचा समावेश

मीनाक्षी गुरव

राज्य सरकारने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार १०८ शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे - राज्य सरकारने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार १०८ शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. पुणे विभागातून पाच शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे.

समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात येतात. राज्यात १९६२-६३ पासून ही पुरस्काराची योजना सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत हे पुरस्कार दिले जातात. २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून या पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहे.

या पुरस्काराची शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी १ सप्टेंबर २०२२ ला राज्य निवड समितीची ऑनलाइन बैठक झाली. त्यानंतर या समितीने शिक्षकांची गुणानुक्रमने प्रवर्गनिहाय निवड यादी राज्य सरकारला सादर केली. त्यानुसार या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या पुरस्काराचे वितरण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी (ता.३) मुंबई येथे होणार आहे.

प्रवर्गनिहाय पुरस्कारांची संख्या -

प्रवर्ग : पुरस्कारांची संख्या

प्राथमिक : ३८

माध्यमिक : ३९

आदिवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षक (प्राथमिक) : १८

थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्शक शिक्षक पुरस्कार : ८

विशेष शिक्षक कला/क्रीडा : २

दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक : १

स्काऊट/गाईड : २

एकूण : १०८

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झालेले पुणे जिल्ह्यातील शिक्षक :

शिक्षकाचे नाव : शाळा

मृणाल गांजाळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव (ता. आंबेगाव)

चित्रा गवारे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडबापडळ (ता.हवेली)

पूजा भुरके : भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर, पुणे

गोरख तावरे : श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बारामती

‘गेल्या १४ वर्षांपासून शाळेमध्ये काम करत आहे. तर गेल्या चार वर्षापासून संस्थेने पर्यवेक्षिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. वैदिक गणितावर आधारित मी सादर केलेल्या प्रकल्पाला राज्यस्तरीय कृतीसंशोधनात राज्यात पाचवा क्रमांक मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला आहे. पुरस्कारासाठी असणाऱ्या निकष पार करत हा पुरस्कार मिळाल्याने प्रोत्साहन मिळत आहे.’

- पूजा भुरके, सहाय्यक शिक्षिका, भारत इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT