bank of Maharashtra recruitment 2021 for generalist officer check details Marathi News 
एज्युकेशन जॉब्स

पदवीधारकांसाठी बँकेत नोकरीची संधी! मिळेल 48 हजार महिना पगार, असा करा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

Bank of Maharashtra Recruitment 2021: बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलस्टिस्ट ऑफिसर Generalist Officer पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. ऑनलाईन अर्ज 22 मार्चपासून सुरू झाले असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 06 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील, शैक्षणिक पात्रता आणि बँक भरतीची फी याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. 

एकूण रिक्त पदे

बँक ऑफ महाराष्ट्रकडे Generalist Officer या पदासाठी एकूण १५० रिक्त पदे आहेत. यात ओपन प्रवर्गासाठी 62, ओबीसीसाठी 40, अनुसूचित जमातीसाठी 22, ईडब्ल्यूएससाठी 15 आणि एसटी प्रवर्गासाठी 11 रिक्त पदांचा समावेश आहे.

पात्रता काय आहे? 

कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कोणत्याही विषयात किमान 60% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्थांकडून सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएमसारखे व्यावसायिक कोर्स केलेले असावेत. त्याव्यतिरिक्त कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून ३ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

25 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत 
लागू होईल.

पगार किती मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना४८,१७० रुपये मासिक पगारासह इतर भत्ते असा भक्कम पगार मिळेल. अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.inbh भेट देऊन अधिसूचना वाचू शकतात. 

अर्ज करण्यासाठी फी.

बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती २०२१ साठी ओपन प्रवर्गासाठी ११८० रुपये अर्ज फी भरावी लागेल. तर एससी/एसटी उमेदवारांसाठी ती ११८ रुपये ठेवण्यात आली आहे. 

निवड प्रक्रिया 

आयबीपीएसमार्फत घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे 1: 4 च्या गुणोत्तरात मुलाखतीच्या फेऱ्यांसाठी बोलवण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीसाठी अनुक्रमे १५० व १०० गुण असून ते ६० : ४० मध्ये रूपांतरित केले जातील. दोन्ही परीक्षांच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT