बॅंक ऑफ बडोदा Sakal
एज्युकेशन जॉब्स

बॅंक ऑफ बडोदामध्ये आयटी प्रोफेशनल्सची भरती!

बॅंक ऑफ बडोदामध्ये आयटी प्रोफेशनल्सची भरती!

सकाळ वृत्तसेवा

बॅंक ऑफ बडोदाने नियमित पद्धतीने स्पेशालिस्ट आयटी ऑफिसर आणि कंत्राटी पद्धतीने आयटी प्रोफेशनलच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सोलापूर : बॅंकेत (Bank) आयटी (IT) सरकारी नोकरीची (Government Job) संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही आहे नोकरीची उत्तम बातमी. बॅंक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) नियमित पद्धतीने स्पेशालिस्ट आयटी ऑफिसर आणि कंत्राटी पद्धतीने आयटी प्रोफेशनलच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बॅंकेने आज, 8 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, स्पेशालिस्ट IT ऑफिसर आणि IT प्रोफेशनलच्या एकूण 52 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार आज, 8 डिसेंबरपासून अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख बॅंकेने 28 डिसेंबर 2021 निश्‍चित केली आहे.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार बॅंक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर करिअर विभागात प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. वेबसाइटला भेट दिल्यानंतर, उमेदवारांना करिअर विभागात जावे लागेल जेथे भरती अधिसूचना डाउनलोडसह ऑनलाइन अर्जाची लिंक दिली आहे. अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर वाटप केलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून, उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील. अर्जादरम्यान उमेदवारांना ऑनलाइनद्वारे 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क फक्त 100 रुपये आहे.

376 जागांसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

दुसरीकडे, बॅंक ऑफ बडोदाने 19 नोव्हेंबर 2021 रोजी वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात 376 सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस उद्या म्हणजेच 9 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर विभागात दिलेल्या लिंकवरून शक्‍य तितक्‍या लवकर अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी बॅंक ऑफ बडोदा 376 रिलेशनशिप मॅनेजर भरती 2021 जाहिरातीचे तपशील तपासणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT