बॅंक ऑफ बडोदा करणार बीसी सुपरवायझर पदांची भरती! "या' शहरांमध्ये आहे संधी Gallery
एज्युकेशन जॉब्स

बॅंक ऑफ बडोदा करणार बीसी सुपरवायझर पदांची भरती!

बॅंक ऑफ बडोदा करणार बीसी सुपरवायझर पदांची भरती! "या' शहरांमध्ये आहे संधी

श्रीनिवास दुध्याल

बॅंक ऑफ बडोदाने बिझनेस करस्पॉंडंट सुपरवायझर अर्थात बीसी पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

सोलापूर : बॅंक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! बॅंक ऑफ बडोदाने बिझनेस करस्पॉंडंट सुपरवायझर (Business Correspondent Supervisor) अर्थात बीसी पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. ही भरती जमशेदपूर (Jamshedpur), पूर्णिया (Purnia) आणि जालंधर (Jalandhar) भागात केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार बॅंक ऑफ बडोदा, bankofbaroda.in च्या अधिकृत वेबसाइटवर करिअर विभागात दिलेल्या अर्जाद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख जालंधर क्षेत्रासाठी 25 सप्टेंबर, पूर्णिया क्षेत्रासाठी 5 ऑक्‍टोबर आणि जमशेदपूर क्षेत्रासाठी 11 ऑक्‍टोबर 2021 आहे.

सर्व क्षेत्रांसाठी अधिसूचना आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी https://www.bankofbaroda.in/career/business-correspondent-supervisors-on-contract-basis या लिंकवर क्‍लिक करा.

जाणून घ्या पात्रता

बॅंक ऑफ बडोदामध्ये बीसी पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार पदवीधर असावेत आणि संगणक ज्ञान (एमएस ऑफिस, ई-मेल, इंटरनेट आदी) असणे आवश्‍यक आहे. तथापि, एमएससी (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए / एमबीए सारख्या उच्च पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, नियुक्तीच्या दिवशी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज आणि निवड प्रक्रिया

संबंधित क्षेत्रासाठीची अधिसूचना आणि अर्ज बॅंकेकडून डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी तो पूर्णपणे भरावा आणि विहित केलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात सादर करावा. उमेदवारांच्या अर्जावर आधारित उमेदवारांना बॅंकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण याची माहिती उमेदवारांना फक्त बॅंकेद्वारे ई-मेलद्वारे पाठवली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या 15 दिवसांच्या आत कळविण्यात येईल.

भरती प्रक्रिया आणि वेतन

उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर 12 महिन्यांसाठी करार आधारावर नियुक्ती दिली जाईल. तसेच दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जाईल. नियुक्तीनंतर दरमहा 15 हजार रुपये निश्‍चित वेतन आणि 10 हजार रुपयांची व्हेरिएबल रक्कम दिली जाईल. अधिक तपशिलासाठी भरती सूचना पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT