Education
Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यास सुरवात

मीनाक्षी गुरव

शाळेला माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीतून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अनुषंगाने हे कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असून त्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

पुणे - शाळेतून शिक्षण घेऊन आता आपापल्या क्षेत्रात अव्वलस्थानी असणारे माजी विद्यार्थी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून देणगी देतात.... अन्‌ त्यांनी दिलेल्या याच देणगीला शाळेनं रोबोटिक्स, परदेशी भाषा अभ्यासक्रम, संगणक जोडणी प्रशिक्षण अशा कौशल्य अभ्यासक्रम स्वरूपात अविस्मरणीय ‘ठेवं’ म्हणून रुपांतरीत केलं अन् यातून साकारलेल्या विविध प्रयोगशाळांमधून आता शिक्षण घेणे आजी विद्यार्थ्यांना शक्य होतंय होय, हे साध्य झालयं ते न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत. निमित्त आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे. शाळेत पाच तंत्र शिक्षण कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

शाळेला माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीतून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अनुषंगाने हे कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असून त्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले, सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, शाला समितीचे अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, सदस्य डॉ. आशिष पुराणिक आदी उपस्थित होते.

माजी विद्यार्थी व उद्योजक प्रमोद चौधरी यांच्या ७५ लाख रुपयांच्या देणगीतून तंत्र शिक्षण कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. शाळेमध्ये इयत्ता सातवी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स कोडिंग, सादरीकरण, संघकृती हे अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. तर इयत्ता पाचवीसाठी संस्कार वर्ग, इयत्ता सहावीसाठी नाट्यशास्त्र, आठवीसाठी टेराकोटा व परकीय भाषा आणि नववीसाठी संगणक जोडणी व देखभाल अशा कौशल्यावर आधारित शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्या-त्या इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम आहे. तसेच १९७४च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीतून स्मार्ट बोर्ड बसविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. कुंटे यांनी दिली. शाळेत लवकरच सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शाळेत राबविण्यात आलेले अभिनव प्रकल्प

- नाट्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी छोटे नाट्यगृह

- कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीत ध्वनिमुद्रण स्टुडिओची निर्मिती

- रोबोटिक्स अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा

- पाच स्मार्ट बोर्ड

- भाषा, विज्ञान, गणित आणि संगणक प्रयोगशाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT