rani channamma university sakal
एज्युकेशन जॉब्स

बेळगाव - RCU मध्ये पदवीचे पुढील शैक्षणिक वर्ष 8 ऑगस्टपासून

राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गंत येणाऱ्या पदवी महाविद्यालयांचे पुढील २०२२-२३ चे शैक्षणिक वर्ष ८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

सतिश जाधव

राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गंत येणाऱ्या पदवी महाविद्यालयांचे पुढील २०२२-२३ चे शैक्षणिक वर्ष ८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गंत (rani channamma university) येणाऱ्या पदवी महाविद्यालयांचे (College) पुढील २०२२-२३ चे शैक्षणिक वर्ष (Educational Year) ८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा (Exam) फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. यासंबंधी विद्यापीठाने शैक्षणिक कॅलेंडर बनविले असून याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाविद्यालयांना केल्या आहेत.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास गेल्या दोन वर्षापासून अडचणी येत आहेत. तरी देखील विद्यापीठाने योग्य नियोजन केल्यामुळे या आधीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. सध्या पदवीचे पहिले, तिसरे व पाचव्या सेमीस्टरचे वर्ग सुरु आहेत. ३१ जानेवारीपर्यंत हे वर्ग चालणार होते. मात्र, विद्यापीठाने यामध्ये बदल केला असून आता हे वर्ग ९ फेब्रूवारीपर्यंत चालणार आहेत. यासंबंधीच्या सुचना संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्याने देण्यात आल्या आहेत. यामुळे या सेमीस्टरसाठी फक्त आठ दिवस कॉलेज भरणार आहे. त्यानंतर परीक्षा होणार आहेत.

१० फेब्रवारी ते ९ मार्च २०२२ पर्यंत पहिली, तिसरी व पाचव्या सेमीस्टरच्या रजा, लिखीत परीक्षा आणि मुल्यमापण आणि निकाल होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या, चौथ्या व पाचव्या सेमीस्टरला सुरुवात होणार आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात १० मार्चपासून होणार आहे. या सेमीस्टरची शेवटची तारीख ९ जुलै आहे. त्यानंतर १० जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत मध्यावती रजा, लिखीत, प्रायोगिक परीक्षा, मुल्यमापण, निकाल लावला जाणार आहे.

प्रथम वर्षाच्या परीक्षा कधी?

पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच परीक्षा अर्ज भरला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पदवीच्या परीक्षा होणार आहेत. यामुळे विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत. मात्र, पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना यंदपासूनच राष्ट्रीय शैक्षणिक निती लागु केली आहे. यामुळे कन्नड सक्तीचा विषय आला आहे. त्यामुळे विद्यापीठाने अध्यापही त्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले नाहीत. त्यामुळे त्यांचे परीक्षा कधी होणार हे चित्र अध्यापही अस्पष्ट आहे.

फक्त दोन दिवसांची सुट्टी

विद्यापीठाने जाहीर केलेल्या शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडरनुसार ६ ऑगस्टपर्यंत सध्याचे शैक्षणिक वर्ष चालणार आहे. तर ८ ऑगस्टपासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहेत. यामुळे फक्त दोनच दिवसांची सुट्टी असणार आहे. यामुळे महाविद्यालयांना या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. महाविद्यालयासमोर ते एक आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT