Student  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Scheme For Student : सरकारची 'ही' योजना विद्यार्थांना करणार मालामाल; जाणून घ्या कसं?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरी बसून अर्ज करता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Government Scheme For Student : शिक्षणाला चालना देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना सरकारकडून चालवली जात आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुखमंत्री बालक बालिका योजना सुरू केली आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

या योजनेंतर्गत विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास सरकारकडून 10,000 रुपये दिले जात आहेत. सरकारची ही योजना केवळ दहावीच्या विद्यार्थांसाठीच असून, यात विद्यार्थांना दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची अट आहे.

या योजनेतंगर्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास या विद्यार्थांना सरकारकडून ८ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात आहे. तुम्हालाही या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, कोणत्याही शाळेत किंवा कार्यालयात न जाता घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता.

मुख्यमंत्री बाल बालिका योजनेत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बिहारच्या शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर वेबपेजवर नोंदणीपर्यायावर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता. नोंदणीची सर्व शहानिशा केल्यानंतर तुम्हाला 10,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

या योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थांना काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षण प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, घराचा पत्ता, बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर गोष्टी असणे आवश्यक आहे.

कोणाला करता येणार अर्ज

अर्ज करणारा विद्यार्थी बिहार राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जर तो यूपी किंवा इतर कोणत्याही राज्यातील असेल आणि बिहारमधून शिक्षण घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच अर्जदाराचे लग्न झालेले नाही, अशी अटही सरकारने घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT