btech food technology education sakal
एज्युकेशन जॉब्स

बीटेक : फूड टेक्नॉलॉजी

शेतकऱ्याच्या शेतात तयार झालेला शेतमाल थेट आपल्या घरात येऊन आपण थेटपणे ते खाणे किंवा त्याचे जिन्नस तयार करणे ही पारंपरिक पद्धत झाली.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

शेतकऱ्याच्या शेतात तयार झालेला शेतमाल थेट आपल्या घरात येऊन आपण थेटपणे ते खाणे किंवा त्याचे जिन्नस तयार करणे ही पारंपरिक पद्धत झाली. परंतु, अन्नपदार्थांमधील अनेकविध प्रकार, विविध प्रॉडक्ट्स तंत्रज्ञानातून निर्माण करणे हे प्रामुख्याने फूड टेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट होते.

विविध तंत्रज्ञान वापरून अन्नपदार्थ तयार करणे, त्यासाठी शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, व्यवस्थित पॅकेजिंग करणे, अन्नाची गुणवत्ता राखणे, आधुनिक तंत्रांचा वापर करून साठवणूक करणे, सुरळीतपणे पुरवठा करणे अशी अनेक कामे फूड टेक्नॉलॉजी कार्यक्षेत्रात केली जातात.

आंबा आणि आंब्यांचे ज्यूस, कैरी आणि लोणचे, मिरच्या आणि मसाले इथपासून सुरू झालेला प्रवास आता जवळजवळ सर्वच पदार्थांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून केला जात आहे आणि ही तयार उत्पादने थेटपणे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. हे सर्व फूड टेक्नॉलॉजीमुळे शक्य होत आहे.

पात्रता

बीटेकसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्ससह बारावी सायन्स उत्तीर्ण असणे ही पात्रता आहे. बायोलॉजी हा विषय असणे अपेक्षित आहे. जेईई, तसेच एमएच सीईटी या प्रवेशपरीक्षा पार करून आपल्याला बीटेकसाठी प्रवेश मिळू शकतो, तर बीएससीसाठी पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी) ग्रूप पुरेसा आहे. फूड टेक्नॉलॉजी संदर्भात अन्य पदव्यांसाठी इतर निकष आहेत. जसे की, बीएस्सीसाठी बारावी सायन्सचे गुण पाहिले जातात.

कोर्सचे स्वरूप

बीटेक हा बारावी सायन्सनंतर चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी कोर्स आहे. तज्ज्ञांच्या थिअरी लेक्चरसोबतच प्रात्यक्षिकांमधूनही शिकविले जाते. प्रयोगशाळेपासून यंत्रशाळेपर्यंत आणि शेतापासून मार्केटपर्यंतचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते. शेवटच्या वर्षात प्रोजेक्ट वर्क असते. इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष कामकाजाचा अंदाज येतो.

विषय

बायोलॉजी, फूड बायोकेमिस्ट्री, फूड मायक्रोबायोलॉजी, फूड प्रोसेसिंग इंजिनियरिंग, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, क्रॉप प्रोसेसिंग इंजिनियरिंग, डेअरी प्लान्ट इंजिनिअरिंग, फूड प्लान्ट सेफ्टी, फूड फर्मेंटेशन, फूड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट, फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, बेकरी अँड कन्फेक्शनरी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, थर्मोडायनामिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल, फूड अँड वेस्ट मॅनेजमेंट, मटेरिअल सायन्स हे विषय शिकायला मिळतात.

पदे

प्रॉडक्शन मॅनेजर, फूड इंजिनिअर, स्टोरेज मॅनेजर, न्यूट्रिशन स्पेशालिस्ट, क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, फूड सेफ्टी ऑफिसर, न्यूट्रिशनल थेरपिस्ट, क्वालिटी मॅनेजर, रिसर्च सायंटिस्ट, फूड ब्लॉगर, शेफ आदी पदांवर काम करता येते.

जबाबदाऱ्या

अन्नावरील प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे, अन्न साठवणूक उपकरणे आणि तंत्रप्रणालींची काळजी घेणे, अन्नाची प्रक्रिया, पॅकेजिंग आणि हाताळणी यांविषयीचे डिझाइन करणे, प्रोटोटाइप मशिनरी, उपकरणे आणि अन्न प्रक्रिया, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि नियमन नीट करणे.

स्कोप

सध्या आउटसोर्सिंगचा जमाना आहे. लोक इथून पुढे आपापल्या कामांमध्ये व्यग्र असण्याचे प्रमाण आणखी वाढत जाईल. अन्नपदार्थ स्वतः तयार करणे हे काम हळूहळू मागे पडून आता रेडिमेड फूडकडे म्हणजेच फास्ट फूडकडे आपण वळत आहोत. दुसऱ्या बाजूला विविधता असलेले, चविष्ट, अन्नघटकांचा शास्त्रोक्त समतोल असलेले पदार्थ स्वच्छतेचे निकष पाळून तयार करून विकण्याचे प्रमाण वाढते आहे. याचाच अर्थ या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Dream Unfulfilled : ‘’धर्मेंद्र यांचे ‘ते’ स्वप्न अर्धवटच राहिले...’’, हेमा मालिनींनी प्रार्थना सभेत केला खुलासा!

IND vs SA, 2nd T20I: शुभमन गिलचा घरच्या मैदानावरही भोपळा! संजू सॅमसनला आता तरी खेळवा, चाहत्यांची मागणी

Navale Bridge Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; घेतला 'हा' निर्णय

Pune Harassment Case : गणेश पार्क ते लोहगाव परिसरात महिलांची छेडछाड करून पाळायचा; शेवटी आरोपी विमानतळ पोलिसांच्या सापळ्यात!

Barshi Land Fraud : जमीन विक्रीचे आमिष दाखवून महिलेची बार्शीत ११.५७ लाख रुपयांची फसवणूक; आरोपी कुटुंबासह गायब!

SCROLL FOR NEXT