एज्युकेशन जॉब्स

Career Tips : बेकिंग कोर्स केल्यानंतर 'या' क्षेत्रांमध्ये कामाच्या मिळतील भरपूर संधी

मागील काही वर्षांमध्ये बेकिंग इंडस्ट्रीचा वाढलेला विस्तार आणि नवनवीन प्रयोगांमुळे लोक या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. अनेकांना केक आणि पेस्ट्री बनवायला आवडते.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : आपल्याला जेव्हा एखादा आनंदाचा किंवा खास प्रसंग साजरा करायचा असेल तर तो आपण काहीतरी गोड खाऊन साजरा करतो. यामध्ये सर्वाधिक वापर केक किंवा पेस्ट्रीचा केला जातो. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा एखादा आनंदाचा प्रसंग असुद्या. अनेक जण हमखास केक कापून तो क्षण साजरा करतात. त्यामुळे, बेकिंग इंडस्ट्रीला मोठी मागणी आहे.

मागील काही वर्षांमध्ये बेकिंग इंडस्ट्रीचा वाढलेला विस्तार आणि नवनवीन प्रयोगांमुळे लोक या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. अनेकांना केक आणि पेस्ट्री बनवायला आवडते. त्यामुळे, अनेक जण या क्षेत्रात करिअर करतात. त्यासाठी आवश्यक असणारा बेकिंगचा कोर्स पूर्ण करतात.

परंतु, काहींना असे वाटते की, केक आणि बेकिंगचा कोर्स केल्यानंतर तुम्ही फक्त स्वत:चे दुकान टाकू शकता आणि त्यात काम करू शकता. परंतु, असे अजिबात नाही. या व्यतिरिक्त या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. कोणत्या आहेत त्या संधी? चला तर मग जाणून घेऊयात.

केक डेकोरेटर

केक डेकोरेटर ही अतिशय स्पेशल व्यक्ती असते. या केक डेकोरेटरचे काम तितकेच विशेष आणि आव्हानात्मक असते. कारण, केक डेकोरेटरला केक आणि इतर पेस्ट्रीजचे युनिक डिझाईन्स तयार करणे आणि त्याची योग्य प्रकारे सजावट करण्याचे काम करावे लागते.

कधीकधी क्लाएंटच्या मागणीनुसार ही त्यात बदल करावे लागतात. बेकिंगचा कोर्स केल्यानंतर तुम्ही बेकरी किंवा एखाद्या केक शॉपमध्ये केक डेकोरेटर म्हणून ही काम करू शकता. तसेच, तुम्ही स्वत:चा व्यवसाय ही सुरू करू शकता.

बेकर

जर तुम्ही केक बेकिंग आणि पेस्ट्रीचा प्रोफेशनल कोर्स पूर्ण केला असेल तर तुम्ही बेकर किंवा केक-पेस्ट्री शेफ म्हणून काम करू शकता. बेकरी, मिठाईचे दुकान किंवा हॉटेलमध्ये ही काम करू शकता.

बेकरचे सर्वात प्रमुख काम म्हणजे विविध प्रकारचे केक, ब्रेड्स, पेस्ट्री आणि इतर बेक केलेले पदार्थ तयार करणे असते. शिवाय, ते पदार्थ चांगल्या प्रकारे बेक करण्याची जबाबदारी बेकरची असते. तुम्ही स्वत:चे दुकान देखील सुरू करू शकता किंवा केक बेकिंगचे क्लासेस देखील घेऊ शकता.

फूड ब्लॉगर

जर तुम्हाला केक-पेस्ट्री बेकिंगसोबत लेखनाची आवड असेल तर तुम्ही फूड ब्लॉगर बनून तुमचे करिअर सुरू करू शकता. तुमच्या लेखनामध्ये तुम्ही तुमची केक-बेकिंगची कौशल्ये समाविष्ट करू शकता, आणि याचे व्हिडिओ देखील बनवू शकता. आजकाल फूड ब्लॉगरला विशेष मागणी आहे. तुम्ही तुमचा फूड ब्लॉग सुरू करून त्यात केक-पेस्ट्रीचे प्रकार, रेसिपीज आणि काही फूड सिक्रेट्स ही शेअर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT